नवी दिल्ली, 20 एप्रिल : भारताने बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचे सरकारने पुरावे द्यावेत, असं सॅम पिट्रोडा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून बराच वाद झाला.
आता पुन्हा एकदा सॅम पिट्रोडा यांनी एअर स्ट्राइकवर विधान केलं आहे. मी जे बोललो होतो ते खरंच होतं, असं म्हणत त्यांनी दुसऱ्यांदा वादाला तोंड फोडलं आहे. या हल्ल्यात 300 लोक मारले गेले असा सरकारचा दावा असेल तर मग यात कुणीच मारलं गेलं नाही, असं आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं का म्हणत आहेत, असा सवाल त्यांनी विचारला.
'हे त्यांचं वैयक्तिक मत'
सॅम पिट्रोडा यांनी हे विधान केलं असलं तरी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं काँग्रसने म्हटलं आहे. आता भाजपची यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल.
Sam Pitroda, Indian Overseas Congress Chief: Few weeks ago I said something about Balakot, immediately PM started tweeting, head of BJP party went wild, called a press conference. Congress leaders started calling me why did you say that? I said what did I say? I said the truth. pic.twitter.com/0mBBbfflGr
— ANI (@ANI) April 20, 2019
सॅम पिट्रोडा म्हणाले, काही आठवड्यांपूर्वी मी बालाकोटबद्दल काही प्रश्न विचारले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच ट्वीट करायला सुरुवात केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माझ्यावर टीका केली. काँग्रेस नेत्यांनी मला विचारलं, मी असं का म्हटलं? त्यावर माझं उत्तर होतं, मी असं काय विचारलं ? मी जे काही म्हटलं ते खरंच आहे.
मी एक प्रश्न विचारला. प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. मी प्रश्न विचारला तर मी राष्ट्रवादी नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, असंही सॅम पिट्रोडा म्हणाले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. यामध्ये सुमारे 300 दहशतवादी ठार झाले, असा दावा भारत सरकारने केला होता. पण या हल्ल्याचे पुरावे अजूनपर्यंत देण्यात आले नाहीत याची आठवण पिट्रोडा यांनी करून दिली.
हवाई हल्ल्याचं भाजप राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता. पण आता मात्र सॅम पिट्रोडा यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
==========================================================================================
VIDEO: नागपुरात बाईकस्वारांचं उन्हापासून असं होणार संरक्षण!