मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : 'जेव्हा बलात्कार टाळता येत नसेल तर आनंद घ्या'; काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

VIDEO : 'जेव्हा बलात्कार टाळता येत नसेल तर आनंद घ्या'; काँग्रेस नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

धक्कादायक म्हणजे या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षही हसू लागले.

धक्कादायक म्हणजे या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षही हसू लागले.

धक्कादायक म्हणजे या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षही हसू लागले.

  • Published by:  Meenal Gangurde

बंगळुरू, 16 डिसेंबर : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेता (Senior leader of Karnataka Congress) आणि कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्काराबाबत (Rape) एक अत्यंत लज्जास्पद वक्तव्य केलं. ते विधानसभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, एक म्हण आहे की, बलात्कार जेव्हा अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा, आणि त्याचा आनंद घ्या. हिच स्थिती तुमची आहे.

विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे बोलत असताना कुमार यांनी धक्कादायक वक्तव्य केलं.

यादरम्यान अध्यक्ष म्हणाले की, जर सर्वांनाच वेळ दिली तर सत्र पुढे कसं जाईल. पुढे ते म्हणाले की, जो निर्णय तुम्ही घ्याल तो मान्य. जसं सुरू आहे ते सुरू राहूदेत आणि स्थितीचा आनंद घ्या. मी व्यवस्थेला नियंत्रित करू शकत नाही. मला संसदेचं कामकाज पाहायला आहे, ते पूर्ण करणं हे माझं काम आहे.

हे ही वाचा-Goa Assembly Elections: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आठ जणांना तिकीट

अध्यक्ष इतकं म्हणून देखील काँग्रेस आमदार राजेश कुमार यांनी असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. जे पाहून संसदेचे सर्व सदस्य हसू लागले. या संपूर्ण घटनेत हैराण करणारी बाब म्हणजे कुमार यांनी हे वक्तव्य संसदेत केलं होतं. कुमार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अध्यक्ष महोदयदेखील हसू लागले.

ही पहिली वेळ नाही की जेव्हा रमेश कुमार यांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

जेव्हा ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यादरम्यान त्यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. ते म्हणाले होते की, माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी आहे. तसं पाहता बलात्कार केवळ एकदाच होतो. मात्र तुम्ही याची तक्रार केल्यानंतर आरोपीला तुरुंगात टाकलं जातं. मात्र वकिल आरोपीला विचारतात, हे कसं झालं आणि किती वेळास झालं. बलात्कार एकदा होता, मात्र कोर्टात 100 वेळा त्याबद्दल बोललं जातं. माझीही हीच अवस्था आहे.

First published:

Tags: Karnataka, Rape, काँग्रेस