Home /News /national /

हृदयद्रावक! दोन चिमुरड्यांना घरात ठेवून बाहेरून कडी लावून आई बाजारात गेली अन्...

हृदयद्रावक! दोन चिमुरड्यांना घरात ठेवून बाहेरून कडी लावून आई बाजारात गेली अन्...

घराच्या तळ मजल्याला अचानक आग (Fire) लागली. यामध्ये दोन निष्पाप भावंडाचा (Two siblings) गुदमरून मृत्यू (Death) झाला आहे.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली, आरडाओरडा झाला. पण घराला बाहेरून कडी असल्यामुळे दोन लहान मुलं आगीच्या ज्वाळांमध्येच अडकून पडली. त्यांना तिथून बाहेर पडता येईना. जीव गुदमरल्यामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू (two siblings death) झाला आहे. या घटनेमुळं आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी नैर्ऋत्य दिल्लीतील सागरपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका घराच्या तळ मजल्याला अचानक आग लागली. यामध्ये दोन निष्पाप भावंडाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. श्रीआंसर आणि आयुष अशी या दोन चिमुकल्या भावंडांची नावं आहेत. दोघेही अनुक्रमे 5 आणि 6 वर्षांचे होते. असं म्हटलं जात आहे, की ज्या मजल्यावर आग लागली होती, तिथं मृत भावंडांचे वडील हवाई चप्पल बनवण्याचा छोटासा व्यावसाय करतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळं ज्या खोलीला आग लागली, त्यावेळी दोन्ही मुलंली आतच होती. या घटनेंदरम्यान या मृत मुलांची आई बाहेरून गेटला कुलूप लावून सामान आणण्यासाठी बाजारपेठेत गेली होती. नेमका याच वेळी हा अपघात झाला आणि यात या दोन निष्पाप भावंडांचा जीव गेला. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर, जल बोर्डाची टीम सर्वप्रथम घटनास्थळी दाखल झाली. तसेच अवघ्या काही मिनीटांत अग्निशमन दलाची टीमही तिथे दाखल झाली. या दोन्ही टीमनं वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना सुरक्षित वाचवलं. पण ही दोन्ही मुलं खालच्या खोलीत तशीच राहिली. त्यामुळं या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची अजूनही चौकशी सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Fire

    पुढील बातम्या