जेव्हा मोबाइल रेंजसाठी मंत्री महाशय झाडावर चढतात...

जेव्हा मोबाइल रेंजसाठी मंत्री महाशय झाडावर चढतात...

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगडपासून सुमारे १२ किमी दूर असलेल्या धोलिया गावी गेले होते.

  • Share this:

05 जून : देशात खेडोपाडी मोबाइल नेटवर्क पोहोचल्याचा कितीही दावा केला जात असला तरी एका घटनेमुळे मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे. ही समस्या सर्वसामान्यांना नेहमी येतेच पण जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्याला याचा सामना करावा लागतो. तेव्हा त्याबाबतचे गांभीर्य जरा वाढल्याचं दिसून येतं.

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगडपासून सुमारे १२ किमी दूर असलेल्या धोलिया गावी गेले होते. मेघवाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्ही आमच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगतो, पण ते आमचं ऐकत नाहीत, असे ग्रामस्थांनी मेघवाल यांना सांगितले. हे ऐकताच मेघवाल यांनी त्वरित अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी या गावात मोबाइल नेटवर्क नसल्याचे सांगितले. तेव्हा खुद्द मेघवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर ग्रामस्थांनीच मेघवाल यांना मोबाइल नेटवर्क मिळवण्याचा उपाय सांगितला. जर त्यांनी झाडाला शिडी लावून त्यावर चढून मोबाइल लावला तर नेटवर्क मिळेल, असा सल्ला दिला. लगेचच त्यांच्यासाठी शिडीची सोय करण्यात आली. आश्चर्य म्हणजे मेघवाल यांनी असे करताच त्यांचा फोन लागला. झाडावरच त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि गावातील समस्येबाबत सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 02:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading