करिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल!

करिना कपूरला करायचं होतं राहुल गांधींना डेट, VIDEO व्हायरल!

'ते राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आले आहेत. तर मी चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या. त्यामुळे त्यांना डेटवर घेऊन जायला आवडेल.'

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूरला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी तिथल्या स्थानिक नेत्यांन केल्याने नवी चर्चा सुरू झालीय. भोपाळमध्ये भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी सुपस्टार करिना कपूरला लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे केली आहे.


ही चर्चा सुरू असताना करिनाच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालाय. 2002मध्ये सीमी गरेवाल यांनी करिना कपूरची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत सीमी गरेवाल यांनी करिनाला प्रश्न विचारला होता की, तुला कुठल्या सेलिब्रेटिसोबत डेटवर  जायला आवडेल?


या प्रश्नावर करिनाने जे उत्तर दिलं त्या उत्तराने सीमी गरेवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. उत्तर देताना करिना म्हणाली, "मी उत्तर देऊ किंवा नको असं झालंय. मी उत्तर दिलं तर ते वादातही सापडू शकते, पण माझं उत्तर आहे, राहुल गांधी. त्यांचे काही फोटो मी इंडिया टुडेमध्ये बघितले आहेत. मला ते आवडले. ते राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आले आहेत. तर मी चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून. त्यामुळे मला नक्कीच त्यांना डेटवर घेऊन जायला आवडेल."


करिनायाच्या या उत्तरानंतर ही मुलाखत चांगलीच गाजली होती. पण त्या काळात सोशल मीडिया नुकताच उदयाला आला होता. नंतर जेव्हा सोशल मीडियाचा प्रभाव वाढला त्यानंतर अधुन मधून ही मुलाखत व्हायरल होत असते. राहुल गांधींच्या लग्नाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा करिनाचं हे राहुल प्रेम हमखास चर्चेला येत असत.


काय आहे करिनाचं भोपाळ कनेक्शन?


करिना कपूर यांचे सासरे आणि माजी क्रिकेटपटू नवाब मंसूर अली खां पतौडी यांना काँग्रेसने 1991 मध्ये लोकसभेसाठी तिकिट दिलं होतं आणि राजीव गांधी त्यांच्या प्रचारासाठी आलेही होते. मात्र या निवडणुकीत पतौडींचा पराभव झाला होता. तोच धागा पकडून आता काँग्रेसचे स्थानिक नेते करिनाला तिकिट देण्याची मागणी करत आहेत.


भोपाळमधले काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू चौहान हे यासाठी प्रयत्न करत आहे. काही नगरसेवकांचा गट तयार करून त्यांनी ही मागणी रेटून धरली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिलं आहे.

पतौडी घराण्याचा प्रभाव भोपाळ आणि परिसरात होता. तसच भोपाळमध्ये युवा मतदारांची संख्या जास्त असल्याने करिनाला उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा होईल असं काँग्रेसला वाटतं.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या