....जेव्हा न्यायाधीशच रिक्षातून सरप्राईज पाहणी करायला बाहेर पडतात

....जेव्हा न्यायाधीशच रिक्षातून सरप्राईज पाहणी करायला बाहेर पडतात

गुरूवारी सकाळी अचानक दिल्ली हायकोर्टातून सहा रिक्षा बाहेर पडल्या. या सहा रिक्षांमध्ये दिल्ली हायकोर्टाचे सहा न्यायाधीश बसले होते ज्यांचे नेतृत्व न्या. गीता मित्तल करत होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली,01 सप्टेंबर: भारतात हॉस्पिटल्सची, वेगवेगळ्या ऑफिसेसची पाहणी करायला मंत्री, पोलीस अनेकदा बाहेर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पण दिल्लीत तर चक्क हायकोर्टाचे न्यायाधीशचं कोर्टांची पाहणी करायला बाहेर पडले . तेही  कुठल्या सरकारी वाहनातून नाही तर रिक्षातून प्रवास करून  हे न्यायाधीश दिल्लीतील कोर्टांची पाहणी करत होते.

गुरूवारी सकाळी अचानक दिल्ली हायकोर्टातून सहा रिक्षा बाहेर पडल्या. या सहा रिक्षांमध्ये दिल्ली हायकोर्टाचे सहा न्यायाधीश बसले होते ज्यांचे नेतृत्व न्या. गीता मित्तल करत होत्या. या न्यायाधीशांनी दिल्लीतील सहा जिल्हा न्यायालयांना अचानक भेट दिली. तेथील कामकाज आणि सुविधांची पाहणी केली.

ही पाहणी कोर्टाचं वातावरण आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांची शिस्तबद्धता पाहण्यासाठी करण्यात आली होती. या 6 कोर्टांवर आता हे न्यायाधीश एक रिपोर्ट तयार करणार असून त्यानुसार या 'न्यायालयांवर' कारवाई केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 10:48 AM IST

ताज्या बातम्या