अयोध्या राम मंदिराचा मुहूर्त कधी? आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार फैसला

अयोध्या राम मंदिराचा मुहूर्त कधी? आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत होणार फैसला

आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राम मंदिर संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी गठीत केलेल्या ‘राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची महत्त्वपूर्ण बैठक आज बुधवारी नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार केंद्र सरकारने या ट्रस्टचे गठण गेले होते. आज या ट्रस्टच्या बैठकीत राम मंदिर उभारणीच्या मुहूर्तासह अन्य विषयांवर विचार केला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी राम मंदिर ट्रस्टची बैठक बोलवण्यात आली आहे. सर्वसामान्यांचा निधी मंदिर उभारणीसाठी वापरण्यात यावा की नाही याबाबतही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत मंदिराच्या पाया रचण्याच्या मुहूर्तापासून पूर्ण होण्यापर्यंतचा कालावधीही निश्चित करण्यात येणार आहे. भविष्यात कोणताही विवाद होऊ नये यासाठी सर्व कारभार पारदर्शी ठेवण्यात येणार आहे. यावेळी मंदिर उभारणीदरम्यान रामाला अन्य ठिकाणी  ठेवण्याच्या स्थानावरही चर्चा केली जाणार आहे.

5 फेब्रुवारी रोजी ट्रस्टची स्थापना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत ट्रस्टच्या अन्य पदाधिकाऱ्यांबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने मंदिर उभारणीसाठी 5 फेब्रुवारी रोजी ट्रस्टची घोषणा केली.

ट्रस्टमध्ये 15 जणांचा सहभाग

‘राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’मध्ये 15 ट्रस्टी आहेत. ज्य़ातील एक ट्रस्टी दलित समाजातील असेल. यादरम्यान भाजप आणि मंदिर आंदोलनाशी संबंधित अनेक नेत्यांनी ट्रस्टींमध्ये ओबीसी समाजातील एका प्रतिनिधीच्या सहभागाची मागणी केली. मंदिर उभारणीसंदर्भातील सर्व नियम ट्रस्टकडून घेतले जातील. विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे की, जर ट्रस्टने सांगितले तर मंदिरासाठी निधी गोळा करण्याचे काम विश्व हिंदू परिषद करेल.

महंत नृत्यगोपालदास यांना ट्रस्टमध्ये सहभागी करता येऊ शकते

या बैठकीत महंत नृत्यगोपालदास यांना ट्रस्टमध्ये सहभागी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 08:02 AM IST

ताज्या बातम्या