पाटना, 14 ऑगस्ट : बिहारमधील (Bihar News) मधुबनी येथून एक अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे मुंबईहून (Mumbai) आलेली नीतू सिंह आपल्या प्रियकराच्या घरासमोर 2 दिवस बसून राहिली. यादरम्यान सासरच्या मंडळींनी तिला घरात येऊ दिलं नाही. गेल्या 2 दिवसांपासून कलुआही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपरिया गावात हाय वोल्टेंज ड्रामा सुरू आहे.
नीतू सिंह या प्रकरणात सांगितलं की, ती मुंबईत राहते. ती अंधेरीतील एका इंस्टिट्यूटमध्ये शिकवत होती. तिने पुढे सांगितलं की, तब्बल 6 वर्षांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथे तिची अभिजीत सिंह याच्यासोबत ओळख झाली. भेटीनंतर हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नीतूने सांगितलं की, 1 वर्षांपासून दोघे अंधेरीतील फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. यादरम्यान ती जे काही कमावत होती, ते अभिजीतला देत होती.
नीतूने पुढे सांगितलं की, 4 महिन्यांपूर्वी अभिजीत तिला मुंबईहून मधुबनी घेऊन आला होता. मात्र येथे त्याने नीतूला एका हॉलेटमध्ये सोडून आपल्या घरी कपरिया येथे निघून गेला. यादरम्यान अभिजीत 4 दिवसांपूर्वी आपल्या घरी होता आणि दोघे फोनवर बातचीत करीत होते. 4 दिवसांनंतप अभिजीत नीतूला मधुबनी येथील हॉटेलमधून पुन्हा मुंबईला घेऊन गेला.
तिने पुढे सांगितलं की, जेव्हापासून अभिजीत घरातून मुंबईला आला होता, तेव्हापासून त्याच्या वागणुकीत बदल झाला होता. फ्लॅटचा करार संपल्यानंतर दोघे कल्याणमधील एका हॉटेलमध्ये 7 जुलैपर्यंत राहिले. यानंतर अभिजीत नीतूला घेऊन आपल्या मामाच्या घरी तब्बल 20 दिवसांपर्यंत राहिला. यादरम्यान अभिजीतची समजूत काढून त्याचे आई-बाबा त्याला आपल्या घरी कपरिया येथे घेऊन गेले. यानंतर नीतू सतत अभिजीतला कॉल करण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र त्याच्यासोबत बोलणं झालं नाही. ज्यानंतर अभिजीतचा शोध घेण्यासाठी ती मुंबईहून कपरियाला पोहोचली. येथे अभिजीतचे आई-वडील तिचा सुनेच्या रुपात स्वीकार करीत नव्हते. त्यामुळे ती गावातच राहिली.
हे ही वाचा-तृणमूल नेत्याच्या पत्नीसोबत भाजप नेत्याचं गैरकृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नीतूने यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिने महिला कल्याण विभागालाही याबाबत सविस्तर माहिती दिली. याशिवाय पोलिसांनीही महिलेची तक्रार नोंदवत तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने नीतू सिंह हिला सासरी मान-सन्माने प्रवेश मिळाला आहे. हाय व्होल्टेज ड्रामानंतर शेवटी अभिजीत सिंह याच्या आई-वडिलांनी तरुणीचा स्वीकार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Love story, Mumbai