राहुल गांधींना कधीपासून मराठी समजायला लागलं ?,गडकरींनी उडवली खिल्ली

राहुल गांधींना कधीपासून मराठी समजायला लागलं ?,गडकरींनी उडवली खिल्ली

निवडणुकीच्या काळात गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात टोल रद्द करण्याबद्दल विचारणा केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 आॅक्टोबर : राहुल गांधींना कधीपासून मराठी समजायला लागलं हे जरा शोधावं लागेल. त्यांनी मराठी भाषा आधी कुणाकडून तरी समजून घेतली पाहिजे मग टीका केली पाहिजे असा टोला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला. तसंच मराठीचा अर्थ न समजता त्यांनी टि्वटरवर माझं अभिनंदनही केलं अशी खिल्ली गडकरींनी उडवली.

'कलर्स मराठी' या वाहिनीवर झालेल्या मुलाखतीचा नितीन गडकरी यांनी सत्तेवर कधी येणार याबद्दल शंका होती असं वक्तव्य केलं होतं. यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वट करून नितीन गडकरी अगदी योग्य बोलले. जनता सुद्धा असाच विचार करतेय की आमच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा असा घात होतोय अशी टीका राहुल गांधी यांनी नितीन गडकरींच्या मुलाखतीचा भाग व्हिडिओ टि्वट करून केली.

राहुल गांधींच्या या टीकेचा नितीन गडकरींनी आज समाचार घेतला. त्या मुलाखतीमध्ये मला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आश्वासनं दिली जातात याबद्दल प्रश्न विचारला होता.

यावर मी सांगितलं होतं की, निवडणुकीच्या काळात गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात टोल रद्द करण्याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी मी त्यांना असा निर्णय जर घेतला तर राज्याला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागेल असं सांगितलं होतं. त्यावर त्यांनी गंमतीत तुम्हाला आमचं राज्य येतंय याची भीती वाटतेय काय असं म्हटलं होतं. पण आम्ही इतकी वर्ष विरोधी पक्षात असल्यामुळे सत्तेत आल्यावर अशा निर्णयाची अंमलबाजवणी करताना अडचणी येऊ शकतात असं स्पष्ट केलं होतं.

नितीन गडकरी पुढे म्हणतात, त्यांनंतर दिल्लीतील एका इंग्रजी दैनिकाने याबद्दलची बातमी प्रसिद्ध केली. त्यात मी ना पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं होतं, ना १५ लाख परत करतील असं काही म्हटलं नव्हतं. ही बातमी वाचून राहुल गांधींनी माझं अभिनंदनही केलं. मुळात राहुल गांधींना मराठी कधीपासून समाजायला लागलं हे जरा शोधावं लागेल असं म्हणत गडकरींनी खिल्ली उडवली.

ज्या टोल निर्णयाबद्दल आमची चर्चा झाली होती त्याबद्दलचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन वचनपूर्ती केली असंही नितीन गडकरींनी सांगितलं.

======================================================

पवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी

First published: October 10, 2018, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading