Kashmir Article 370 चा मसुदा करायला डॉ. आंबेडकरांनी दिला होता नकार

Kashmir Article 370 चा मसुदा करायला डॉ. आंबेडकरांनी दिला होता नकार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या Article 370 चा मसुदा तयार करायला नकार दिला होता. त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे काम एन. गोपालस्वामी अय्यंगार यांच्याकडे सोपवलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या Article 370 चा मसुदा तयार करायला नकार दिला होता. त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे काम एन. गोपालस्वामी अय्यंगार यांच्याकडे सोपवलं. एन. गोपालस्वामी अय्यंगार हे नेहरूंच्याच मंत्रिमंडळात मंत्री होते. या दाव्याला काही इतिहासकार आणि तज्ज्ञांनी विरोध केला असला तरी अनेक तज्ज्ञांनी याला दुजोराही दिला आहे.

1949 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मिरी नेते शेख अब्दुल्ला यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी सल्लामसलत करून हा मसुदा बनवायला सांगितलं होतं. पण घटना समितीचे अध्यक्ष आणि कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याला विरोध असल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी हा मसुदा करायला नकार दिला, असं लॉ कॉर्नर या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

पाकव्याप्त काश्मीर भारताच्याच ताब्यात येणार का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Article 370 ही काश्मीरसाठीची तात्पुरती तरतूद होती. या कलमानुसार, काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र ध्वज बहाल करण्यात आला. आता मात्र भाजपने हे कलम रद्द केलं आहे. त्यानुसार काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे.

काय म्हणाले होते डॉ. आंबेडकर?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'भारताने काश्मीरच्या सीमा राखाव्या, काश्मीरमधले रस्तेही भारताने बांधावे, काश्मीरला अन्नपुरवठा करावा आणि तरीही काश्मीरला भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी तुमची इच्छा आहे. भारत सरकारला काश्मीरबदद्ल मर्यादित अधिकार असावे आणि भारतीयांनाही काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. या तुमच्या प्रस्तावाला मंजुरी देणं हे देशहिताच्या विरोधात असेल आणि भारताचा कायदा मंत्री या नात्याने मी याला कधीच मान्यता देणार नाही.'

Article 370: मोदी आणि अमित शहांबदद्ल पाकिस्तानी मीडिया म्हणतो...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिल्यानंतर शेख अब्दुल्ला पंडित नेहरूंकडे गेले. पंतप्रधानांच्या आदेशानंतर एन. गोपालस्वामी अय्यंगार यांनी मसुदा तयार केला. यानंतर काही दिवसांनी अय्यंगार आणि शेख अब्दुल्ला यांच्यातही मतभेद झाले. त्यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारानंतर एन. गोपालस्वामी अय्यंगार यांनी घटना समितीचा राजीनामा देण्याचाही इशारा दिला होता. पंडित नेहरू परदेशात असताना अय्यंगार यांनी वल्लभभाई पटेल यांची मदत मागितली. वल्लभभाईंनी पक्षातल्या नेत्यांचं मन वळवून या मसुद्याला मंजुरी मिळवली. वल्लभभाई पटेल यांनी त्याबद्दल पंडित नेहरूंना पत्रही लिहिलं आहे.

====================================================================================================

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 5, 2019, 8:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading