VIDEO ओवेसी शपथ घेताना लोकसभेत लागले 'भारत माता की जय' चे नारे

VIDEO ओवेसी शपथ घेताना लोकसभेत लागले 'भारत माता की जय' चे नारे

ओवेसींनी उर्दुतून आणि 'खुदा'ला स्मरून शपथ घेतली. शपथ झाल्यावर त्यांनी, जय भीम, तकबीर, अल्ला हु अकबर आणि जय हिंद अशी घोषणा दिली.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जून :  17 व्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. लोकसभा नवीन असल्याने सुरुवातीला सर्व सदस्यांचा शपथविधी सध्या सुरू आहे. पहल्या दिवशी 300 पेक्षा जास्त सदस्यांनी शपथ घेतली. आज MIMचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतली. ओवेसी शपथ घेण्यासाठी येत असतानाच भाजपच्या सदस्यांनी भारत 'माती की जय' आणि 'वंदे मातरम'चे नारे लावले. भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी यांनीही हातवारे करत आणखी मोठ्याने घोषणा द्या, असं हातानेच सुचवलं. त्यांनी उर्दुतून आणि 'खुदा'ला स्मरून शपथ घेतली. शपथ झाल्यावर त्यांनी, जय भीम, तकबीर, अल्ला हु अकबर आणि जय हिंद अशी घोषणा दिली.

ओवेसी हे सभागृहात बोलत असताना अतिशय आक्रमकपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या बोलण्यामुळे वादही निर्माण होतात. भाजप आणि शिवसेनेचे सदस्य हे कायम त्यांना टोकण्याचा प्रयत्न करत असतात.

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे बिर्ला

भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. ओम बिर्ला लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDAचे उमेदवार आहेत. ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावं देखील लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होती. पण, या सर्वांची नावे आता मागे पडली असून ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर बुधवारी ( उद्या ) संसदेमध्ये मतदान होईल. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading