रामायणातल्या वानरांनी खरंच राम सेतू बांधला का? उलगडणार सर्व रहस्य, समुद्राच्या पाण्याखाली संशोधन सुरू

रामायणातल्या वानरांनी  खरंच राम सेतू बांधला का? उलगडणार सर्व रहस्य, समुद्राच्या पाण्याखाली संशोधन सुरू

रामायणात म्हटल्याप्रमाणे, भगवान श्रीराम यांना रावणाच्या कैदेतून सीता माईंना सोडविण्यासाठी लंकेला जाता यावं यासाठी वानरसेनेनं हा सेतू बांधला. खरंच श्रीलंकेच्या समुद्रात राम सेतू दिसतो. ते नेमकं काय आहे?

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी : भारत (India )आणि श्रीलंका (Sri Lanka) यांना जोडणारा समुद्रातील राम सेतू (Ram Setu) कधी आणि कसा निर्माण करण्यात आला या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आता भारतीय पुरातत्व खात्यानं (ASI) विशेष संशोधन सुरू केलं आहे. यासाठी या वर्षी पाण्याखाली एक संशोधन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळं रामायण काळाबाबत माहिती मिळवणंही शक्य होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या केंद्रीय सल्लागार समितीनं सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचा (NIO) एक प्रस्ताव मान्य केला असून, आता या संस्थेचे वैज्ञानिक राम सेतूबाबत संशोधन करणार आहेत.

भारतातील महाकाव्य रामायणात प्रभू रामचंद्रांना श्रीलंकेत जाता यावं म्हणून वानरसेनेने भारत ते श्रीलंका असा दगडांचा सेतू समुद्रात उभारल्याचं वर्णन आहे. रामभक्तांची तशी श्रद्धाही आहे. त्यालाच दुजोरा देणारा सेतू त्या परिसरात अजूनही अस्तित्वात आहे. पण आता हजारो वर्षांनंतर तो समुद्राच्या पाण्याखाली गेला आहे. याची सतत्या पडताळणी करण्यासाठी हे संशोधन करण्यात येणार आहे.

1999 पासून बंद असलेल्या हॉस्पिटलमध्ये दिसली एक भीतीदायक आकृती, VIDEO VIRAL

या संशोधनामुळं राम सेतूचं आयुष्य आणि रामायणाचा काळ याबाबत माहिती मिळवणं शक्य होईल, असं या प्रकल्पाशी निगडीत शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या संशोधनासाठी एनआयओच्या वतीनं सिंधू संकल्प किंवा सिंधू साधना नावाच्या जहाजांचा वापर करण्यात येणार आहे. ही जहाजं पाण्याखाली 35 ते 40 किलोमीटर खोलीवरचे नमुने गोळा करू शकतात. राम सेतूच्या आसपास वस्ती होती का, याचा शोधही या संशोधनात घेता येणार आहे. रेडिओमेट्रीक आणि थर्मोल्युमिन्सेस डेटिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात करण्यात येणार आहे. यावेळी शेवाळ, प्रवाळ बेटं यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. ज्यामुळे राम सेतू किती वर्षांपूर्वी बांधण्यात आला, याचा शोध घेता येणार आहे.

Lion costume घालून तो खऱ्या सिंहांसमोर गेला आणि... काय झालं पाहा VIDEO

या प्रकल्पाला धार्मिक आणि राजकीय महत्त्वही आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाला विशेष स्थान आहे. ऋषी वाल्मिकी यांनी रचलेला हा ग्रंथ आजही भारतीय संस्कृतीतील महाग्रंथ मानला जातो. भगवान श्रीरामांना देव मानून त्यांची पूजाअर्चा होते. श्रीरामांना आदर्श मानलं जातं. कोट्यावधी भारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्रीरामांची असंख्य मंदिरं देशात आहेत. रामायणातील कथा आजही सांगितल्या जातात.

रामायणात म्हटल्याप्रमाणे, भगवान श्रीराम यांना रावणाच्या कैदेतून सीता माईंना  सोडविण्यासाठी लंकेला जाता यावं यासाठी वानरसेनेनं हा सेतू बांधला. हा पूल 48 किलोमीटर लांबीचा आहे. राम सेतूला याच धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. 2007मध्ये भारतीय पुरातत्व खात्यानं असा कोणताच पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं होतं, नंतर मात्र या संदर्भातील शपथपत्र सर्वोच्च न्यायालयातून मागं घेतलं होतं.

First published: January 14, 2021, 9:18 PM IST
Tags: ram setu

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading