कारगिल युद्धात पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटची अशी झाली होती थरारक सुटका

कारगिल युद्धात पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटची अशी झाली होती थरारक सुटका

कारगिल युद्धाच्या वेळी 26 वर्षांचा नचिकेता MiG-27 या लढाऊ विमानाचा पायलट होता. युद्धाच्या दरम्यान त्याच्या विमानात बिघाड झाला आणि तो पाकिस्तानच्या हद्दीत कोसळला.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी :   1999 च्या कारगिल युद्धादरम्यान फ्लाईट लेफ्टनंट के नचिकेता हे नाव सर्व देशाला माहित झालं होतं. त्याचं कारणही तसच होतं. नचिकेता युद्धभूमीवर असताना पाकिस्तानच्या ताब्यात सापडला होता. नंतर भारताने मुत्सद्देगिरी करत त्याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडवलं होतं. ही कामगिरी केली होती त्यावेळा पाकिस्तानात उच्चायुक्त असलेल्या जी पार्थसारथी यांनी.

कारगिल युद्धाच्या वेळी 26 वर्षांचा नचिकेता MiG-27 या लढाऊ विमानाचा पायलट होता. युद्धाच्या दरम्यान त्याच्या विमानात बिघाड झाला आणि तो पाकिस्तानच्या हद्दीत कोसळला. पाकिस्तानी सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले.

पाकिस्तानने त्याचा मोठा अपप्रचार केला. जिनिव्हा करारानुसार युद्धात पकडलेल्या कैद्याबाबत काही नियम आहेत. त्या देशाने संबंधीत देशाला त्याविषयी औपचारिकपणे कळवण गरजेचं आहे. त्याला योग्य वागणूक द्यावी असाची संकेत आहे.

पाकिस्तानने ही माहिती इस्लामाबादला उच्चायुक्त असलेले पार्थसारथ यांना कळवली. नंतर तत्कालीन पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नचिकेताला सोडण्यात येणार असल्याचं जाहीर केले.

त्यासाठी खास पत्रकार परिषद घेऊन नचिकेताला हजर करण्यात  येणार होतं. त्या पत्रकार परिषदेत पार्थसारथी यांनाही बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बाणेदारपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन त्याला दाखवणं योग्य नाही. तुम्ही अशी टिंगल करणार असल्याने मी येणार नाही. तुम्हाला त्याला दुतावासात सोडावं लागेल.

या उत्तराने तो पाकिस्तानी अधिकारी दबकून गेला. नंतर नियमांनुसार पाकिस्तानने त्या पायलटला संध्याकाळी दुतावासात आणून सोडलं. नंतर दुसऱ्या दिवशी पार्थसारथी नचिकेताला घेऊन वाघा सीमेवरून भारतात परतले. पंतप्रधान वाजपेंना नचिकेता भेटायला गेला. सात दिवसांमध्ये मृत्यूच्या दाढेतून नचिकेताची सुटका झाली.

First published: February 27, 2019, 5:59 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading