अन् घोड्याची सटकली... हाॅर्न वाजवणाऱ्या कारवरच घेतली उडी

अन् घोड्याची सटकली... हाॅर्न वाजवणाऱ्या कारवरच घेतली उडी

  • Share this:

05 जून : जयपूरमध्ये आज (सोमवारी) सकाळी एक विचित्र अपघात झाला आहे. शहरातल्या वाहतूक कोंडी, आवाजाचं प्रदूषणानं प्राण्यांना कुठपर्यंत त्रास होत असेल याची जाणीव करून देणाराही आहे. एक घोडा आणि कारमध्ये जोरदार टक्कर झाली, ज्यामध्ये कार चालक आणि घोडा दोघेही जखमी झाले आहेत.

जयपूरच्या सिव्हिल लाईनमध्ये रस्त्यावर नेहमीसारखी प्रचंड गर्दी होती. त्यात वाहनांमुळे अनेक ठिकाणी जाम लागलेला होता. याच रस्त्यांवरून घोडागाडीही जात असतात. एका कारवाल्यानं मोठ्यानं हॉर्न वाजवला आणि समोरून येणारा घोडा बिचकला. वाहनांच्या हॉर्नचा घोड्याला एवढा त्रास झाला की त्यानं डायरेक्ट कारवर उडी घेतली. त्यात गाडीच्या काचा फुटल्या आणि घोडा गाडीत घुसला.

या सर्वप्रकारात घोड्याला तर इजा झालीच पण ड्रायव्हरही जखमी झालाय. पण बिचाऱ्या घोड्याला लहानशा गाडीतून ओढून बाहेर काढताना यातना सहन कराव्या लागल्या. त्यात तो रक्तबंबाळही झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 05:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading