अपघाताने वाचवले तिघांचे प्राण, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

अपघाताने वाचवले तिघांचे प्राण, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दोन कारच्या अपघातात वाचले दाम्पत्यासह बाळाचे प्राण. पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

  • Share this:

फिनिक्स, 26 ऑक्टोबर: रस्त्यावर अपघातात नागरिकांचा मृत्यू झाल्याची किंवा गाडीने फुटपाथवरील नागरिकांना चिरडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र एका अपघातामुळे तीन जणांचे चक्क प्राण वाचले असल्याचा प्रकार अमेरिकेत घडला आहे. दोन कारच्या धडकेत तिघांचा जीव वाचल्याचा व्हिडिओ अमेरिकेतील पोलिसांनीच आपल्या फेसबुक अकाऊंटला शेअर केला आहे.

अमेरिकेतील फिनिक्स इथे मंगळवारी एक दाम्पत्य आपल्या बाळाला बाबागाडीतून घेऊन रस्ता क्रॉस करत असताना हा प्रकार घडला.

दोन कारच्या अपघातात वाचले तिसऱ्याचे प्राण, नेमकं काय घडलं

फिनिक्स इथे मंगळवारी एक दाम्पत्य रस्ता क्रॉस करण्यासाठी उभं होतं. रेड सिग्नल लागताच त्यांनी बाळाला बाबागाडीतून (पाळणा)घेऊन रस्ता क्रॉस करत होते. त्याच वेळी समोरुन एक भरधाव कार येत होती. रेड सिग्नल तोडून ही भरधाव गाडी दाम्पत्याला चिरडणारच होती तेवढ्यात दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या गाडीची धडक आधीच्या गाडीला झाली आणि दोन्ही गाड्यांचे रस्ते बदलले. या दोन गाड्यांच्या अपघातात दाम्पत्यासह चिमुकल्याचाही जीव वाचला आहे. जर त्याचवेळी ती गाडी आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 13 सेकंदाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. पोलिसांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे.

पोलिसांनी शेवरोले क्रूज गाडीच्या ड्रायव्हरचं कौतुक केलं आहे. त्यावेळी तो देवासारखा धावून आला नसता तर मोठी दुर्घटना घडली असती. देवदूताप्रमाणे त्याने तिघांचे प्राण वाचवले. पोलिसाच्या माहितीनुसार भरधाव कारमध्ये 28 वर्षीय तरुण आणि महिला गाडीत होते. नशेत कार चालवत असल्यामुळे तरुणाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे कार वेगात सिग्नल तोडून गेली असं सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी समोरून आलेल्या गाडीची एवढी जोरात धडक होती की दोन्ही गाड्यांची दिशा बदलली आणि दाम्पत्यासह चिमुकला वाचला. याप्रकऱणी पोलिसांनी कार चालकाविरोधात नशेत गाडी चालवणं, सिग्नल तोडणं आणि वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. महिला आणि कारचालक दुर्घटनेनंतर दोघेही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. मात्र हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 26, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading