माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नाकाची झाली होती सर्जरी?

इंदिराजींनी नाकावर मलमपट्टी करून कोलकत्त्यातल्या सभेतही भाषण केलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 11:01 PM IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नाकाची झाली होती सर्जरी?

प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे त्यांच्याकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी म्हणून पाहिलं जात असताना प्रियांका गांधींनी इंदिराजींसारखं दिसण्यासाठी सर्जरी केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. तसंच इंदिरा गांधींच्या नाकाची सर्जरी झाली होती असंही म्हटलं जातं.

1967 मध्ये फेब्रुवारी महिन्यात इंदिरा गांधी देशभर प्रचारसभा घेत होत्या. तेव्हा इंदिराजी पंतप्रधान झाल्या तरी त्यांना पेलणार नाही असाच समज सर्वत्र होता. त्या समजुतीला इंदिराजींनी पुढे खोटं ठरवलं आणि खंबीरपणे देशाचं नेतृत्व केलं.

1967 साली इंदिरा गांधी प्रचारासाठी ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये गेल्या होत्या. तेव्हा गर्दी जास्त असल्याने आयोजकांना त्यावर नियंत्रण करणे कठीण झाले. याच गर्दीत काही समाजकंटकही होते. त्यांनी दगडफेक सुरू केली.

Loading...

याचवेळी गर्दीतून भिरकावलेला एक दगडाचा तुकडा इंदिरा गांधींच्या नाकाला लागला. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागलं तेव्हा तिथल्या सुरक्षारक्षकांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना स्टेजच्या मागे जाण्याची विनंती केली. मात्र, इंदिराजींनी कोणाचेही ऐकलं नाही.

नाकातून रक्त येत असताना रुमालाने रक्तस्त्राव रोखून धरत इंदिरा गांधी त्याच ठिकाणी भाषणाला उभा राहिल्या. त्या भाषणानंतर इंदिरा गांधींना दिल्लीला परतण्याचा सल्ला देण्यात आला. तोदेखील धुडकावून लावत इंदिराजींनी नाकावर मलमपट्टी करून पुढं कोलकत्त्यातल्या सभेतही भाषण केलं.

कोलकत्त्यातील सभेनंतर इंदिरा गांधी दिल्लीला पोहचल्या. तिथं त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागणार असल्याची कल्पना त्यांना दिली. त्यानंतर इंदिरा गांधींच्या नाकाचं ऑपरेशन करण्यात आलं.

नाकावर उपचार झाल्यानंतर इंदिरा गांधी गंमतीने म्हणायच्या की, मला वाटलं होतं की डॉक्टर माझ्या नाकाची सर्जरी करून ते सुंदर करतील. तुम्हाला तर माहिती आहे माझं नाक किती लांब आहे. त्याला सुंदर करण्याची एक संधी गमावली. डॉक्टरांनी काहीच केलं नाही आणि नाक आहे तसंच राहिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2019 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...