'हेरगिरी प्रकरणी सरकारला सावध केलं होतं', Whatsapp ने दिलं उत्तर

Whatsapp हॅक करून हेरगिरी प्रकरणी सरकारने कंपनीला नोटीस पाठवून उत्तर मागितंल होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 09:55 AM IST

'हेरगिरी प्रकरणी सरकारला सावध केलं होतं', Whatsapp ने दिलं उत्तर

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सरकारने याप्रकरणी व्हॉटसअॅपला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितलं होतं. यावर कंपनीने म्हटलं आहे की, हेरगिरीबाबत कंपनीने सरकारला यावर्षी मे महिन्यात कल्पना दिली होती. एका इस्रायलच्या स्पायवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारवरच हल्लाबोल करत हेरगिरी केल्याचा आरोप केला आहे.

व्हॉटसअपने शुक्रवारी जाहीर केलं की, ककोणत्याही युजरची गोपनीयता आणि सुरक्षा याला आमचं प्राधान्य असतं. आम्ही हे प्रकरण सोडवलं होतं. तसेच भारतासह इतर देशांच्या सरकारला याबाबत सावधही केलं होतं.

स्पायवेअरच्या मदतीनं मोबाइल हॅक केल्याचं प्रकरण वाढल्यानंतर माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी 2011 ते 2013 या काळात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि जनरल व्ही के सिंग यांची हेरगिरी झाल्याचं सांगत व्हॉटसअॅपकडे उत्तर मागितलं होतं. याशिवाय भारतातील पत्रकार, मानवाधिकार यांचेही फोन हॅक झाले आहे.

एनएसओ कंपनीवर व्हॉटसअॅप सर्व्हरचा वापर केल्याचा आऱोप आहे. त्याच्या माध्यमातून 29 एप्रिल 2019 ते 10 मे 2019 या कालावधीत 1 हजार 400 युजर्सच्या मोबइल फोनवर मालवेअर अटॅक करण्यात आला. त्यातून हेरगिरी करण्यात आली. यामध्ये 20 देशांमधील पत्रकार, सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश आहे

अमेरिका, युएई, बहरीन, मेक्सिको, पाकिस्तान, भारत या देशांमधील लोकांचे फोन हॅक झाले. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं मात्र, नेमकं याच देशांमधील अधिकारी आणि लोकांचे फोन हॅक झाले. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली हे निश्चितपणे सांगता येत नाही.

Loading...

भारतातील मानवाधिकार कार्यकर्ता आणि वकील शालिनी गेरा यांनीही आपलं व्हॉटसअॅप हॅक केल्याचं म्हटलं आहे. गेल्या महिन्यात टोरांटो युनिव्हर्सिटीच्या सिटिझन लॅबच्या जॉन स्कॉट रेल्टन यांनी संपर्क केला होता. जॉनने माझ्या फोनबाबतची माहिती दिली. मला त्याची तपासणी करण्यासही सांगितलं असं गेरा यांनी म्हटलं. गेरा या या एल्गार परिषदेच्या प्रकारणात आरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांचा बचाव करणाऱ्यांपैकी एक आहेत.

पोरांची फी बाकी, मंत्रालयासमोर आत्महत्याच करेन; पवारांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: whatsapp
First Published: Nov 2, 2019 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...