Delhi Election 2020 : अरविंद केजरीवाल आणि निवडणुकीचं हे आहे व्हॅलेंटाईन डे कनेक्शन

Delhi Election 2020 : अरविंद केजरीवाल आणि निवडणुकीचं हे आहे व्हॅलेंटाईन डे कनेक्शन

केजरीवाल यांना बहुमत मिळालं तर ते 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून त्यांचं आणि व्हॅलेंटाईन डेचं खास कनेक्शन असल्याचं मानलं जातंय.

  • Share this:

नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची जादू पुन्हा एकदा चालल्याचं स्पष्ट झालंय. आम आदमी पक्षाला बहुमत मिळणार हे आता स्पष्ट झालं असून भाजपचं सत्ता मिळविण्याचं स्वप्न भंगलं आहे. अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला विक्रमी 67 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला फक्त 03 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसला मात्र आपली कामगिरी सुधारता आलेली नाही. केजरीवाल यांना बहुमत मिळालं तर ते 14 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून त्यांचं आणि व्हॅलेंटाईन डेचं खास कनेक्शन असल्याचं मानलं जातंय.

व्हॅलेंटाईन डे 2013

दिल्ली विधानसभेत 2013मध्ये पहिल्यांदाच 'आप'ला सत्ता मिळाली होती. यावेळी 'आप'ला 28, भाजपला 31 आणि काँग्रेसला 08 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या मदतीने अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र हे सरकार फक्त 49 दिवसच टिकलं. केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच राजीनामा दिला होता. 'आप'चं हे सरकार चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं.

निकाल येण्याआधीच भाजपने स्वीकारला पराभव? जाणून घ्या VIRAL फोटोचं सत्य

व्हॅलेंटाईन डे 2015

यावर्षी झालेल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 'आप'चे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी घोषणा केली होती की, आपला जर लोकांनी संधी दिली तर ते 14 फेब्रुवारीला रामलीला मैदानावरच शपथ घेतील. लोकांनी 'आप'वर विश्वास टाकत भरभरून 67 जागा दिल्या. तर भाजपला फक्त 03 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला आपलं खातं खोलता आलं नाही. त्यावेळी केजरीवालांनी पूर्णबहुमताच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून 14 फेब्रुवारीलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

LIVE Delhi Result: दिल्लीत 'आप' करणार हॅट्रीक, भाजपचं स्वप्न भंगणार

व्हॅलेंटाईन डे 2018

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी आपने एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हा कार्यक्रम व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि व्हॅलेंटाईन डे चं खास कनेक्शन असल्याचं मानलं जातंय.

First published: February 11, 2020, 10:55 AM IST

ताज्या बातम्या