Home /News /national /

काय चाललंय काय? फ्लॅटची किंमत 7 लाख आणि विजेचं बिल आलं 77 लाख....

काय चाललंय काय? फ्लॅटची किंमत 7 लाख आणि विजेचं बिल आलं 77 लाख....

जर 4 जानेवारीपर्यंत विजेचं बिल भरलं नाही तर सुमारे 2.24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशीही नोटीस पाठवण्यात आली आहे

    गुडगाव, 1 जानेवारी : कोरोनामध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये विजेची बिलं (electricity bill) पाहून अनेकांची धसका घेतला. अगदी शेतकरी किंवा गरीब घरांमधील विजेचं बिल लाखांमध्ये पाठविण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून यावर मोठी चर्चा सुरू आहे. अगदी काही सेलिब्रेटिंनीही विजेच्या बिलावर आक्षेप नोंदवला आहे. विजेच्या मीटरचं रीडिंग दाखल केलेल्या दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमकडून (डीएचबीवीएन) ग्राहकांना विजेचं बिल पाठवलं जात आहे. सेक्टर 57 मधील हाऊसिंग बोर्डाच्या तब्बल 200 चौरस फूटाच्या इडब्ल्यूएक फ्लॅटचं दोन महिन्याचं विजेचं बिल तब्बल 77,31 लाख रुपये आलं आहे. (The price of the flat is 7 lakhs and the electricity bill is 77 lakhs ) हेही वाचा-गर्लफ्रेंडच्या मोबाइलमधील या एका गोष्टीमुळे आरोपीचा भांडाफोड; चिनी नागरिक गजाआड 4 जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीस हाऊसिंग बोर्डाच्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील घर क्रमांक 373 च्या तळ मजल्यावर गोपाळ राम राहतात. त्याचं विजेचं बिल जवळपास 77.31 लाख रुपयांवर आले आहे. वीज बिल भरण्याची नोटीस 4 जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे 2.24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. (The price of the flat is 7 lakhs and the electricity bill is 77 lakhs) यापूर्वीही चुकीचं वीज बिल आलं होतं. त्याचप्रमाणे फ्लॅट नंबर 372 जीएफ रहिवासी हुकम सिंह यांचे विजेचे बिल सुमारे 47 हजार रुपये आले आहे. फ्लॅट नंबर 182 च्या तळमजल्यावर छत्रपाल अरोडा राहतात. त्यांना 99 हजार रुपये विजेचं बिल आलं आहे. दरम्यान भारतात नवीन कोरोना व्हायरसचा (New strain of Coronavirus) संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये बदल झाल्याचं (Mutation in Coronavirus) लक्षात आलं आणि आता हा नवा अवतार जगभर पसरत आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या काही प्रवाशांमध्ये हा नवा विषाणू सापडला आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या आपल्या देशात 29 झाली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या