व्हॉट्स अ‍ॅपचं वैशिष्ट्य असलेलं हे फिचर होऊ शकतं बंद

व्हॉट्स अ‍ॅपचं वैशिष्ट्य असलेलं हे फिचर होऊ शकतं बंद

व्हॉट्स अ‍ॅपवरचे मेसेज हा फक्त पाठवणारा आणि ते ज्याला पाठवले आहेत तोच वाचू शकतो. या दोन व्यक्तींशिवाय तिसरी व्यक्ती हे मेसेज वाचू शकत नाही. पण याच फिचरवर आता बंदी येऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : व्हॉट्स अ‍ॅपवरचं संभाषण रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वापरणं अनेकांना सुरक्षित वाटतं. व्हॉट्स अ‍ॅपवरची साठी वापरलं जाणारं 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' तंत्रज्ञान त्यामुळेच लोकप्रिय आहे.

पण जे 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' ही व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आहे तेच फिचर आता बंद होण्याची शक्यता आहे. एका अमेरिकन मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी अधिकारी या एन्क्रिप्शन बॅनवर चर्चा करत आहेत. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या बैठकीतही यावर विचार करण्यात आला आहे.

संभाषण दोन व्यक्तींमध्येच

व्हॉट्स अ‍ॅपवरचे मेसेज हा फक्त पाठवणारा आणि ते ज्याला पाठवले आहेत तोच वाचू शकतो. या दोन व्यक्तींशिवाय तिसरी व्यक्ती हे मेसेज वाचू शकत नाही. कंपनीच्या बरोबरच कोणतीही कायदेशीर यंत्रणाही ते वाचू शकत नाही. व्हॉट्स अ‍ॅपप्रमाणेच अ‍ॅपलचे मेसेजही 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या या फिचरवर ट्रम्प सरकार कोणताही निर्णय घेऊ शकलेलं नाही. यावर बंदी आणायची झाली तर त्यात बरेच बदल करावे लागतील.

अ‍ॅपलने केली होती मनाई

याआधी एका घटनेत, सॅन बर्नाडिनो नावाच्या एका शूटरचा फोन अनलॉक करायला अ‍ॅपलने मनाई केली होती. त्यानंतर एफबीआयने 10 लाख डॉलर देऊन हा फोन अनलॉक केला. त्यानंतर अ‍ॅपलने ही त्रुटीही शोधून काढली आणि फोन अनलॉक होणार नाही, अशी व्यवस्था केली.

काँग्रेसचा शोध संपला, सोनियांनी या नेत्याला अध्यक्षपदासाठी केला फोन

व्हॉट्सअ‍ॅपचं 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' हे फिचर काढलं तर भारतीय युझर्सच्या प्रायव्हसी वर ही गदा येणार आहे. हे फिचर काढलं तर व्हॉट्सअ‍ॅपची ओळखच राहणार नाही, असं या कंपनीनेही म्हटलं आहे.

================================================================================================

SPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...

First published: July 1, 2019, 8:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading