मुंबई, 25 डिसेंबर : देशात ओमिक्रॉनची (Omicron) दहशत हळूहळू वाढू लागलीय. दररोज ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनचा पहिला शोध घेणारे डॉ. अँजेलिक कोएत्झी (Dr. Angelique Coetzee) यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) या नवीन वेरिएंटच्या संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ दिसून येईल, परंतु दक्षिण आफ्रिकेप्रमाणे बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसण्याची अपेक्षा आहे. 'दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशन'च्या अध्यक्षांनी असेही सांगितले की सध्याच्या लसी नक्कीच रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करतील, परंतु लसीकरण न झालेल्या लोकांना 100 टक्के जोखीम आहे.
डॉ. कोएत्झी यांनी प्रिटोरिया येथून फोनवर पीटीआयला सांगितले की, "सध्याच्या लसी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी खूप मदत मिळेल. ते म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीला लस देण्यात आली असेल किंवा ज्या व्यक्तीला आधीच कोरोनाची लागण झाली असेल तर हा संसर्ग कमी लोकांमध्ये पसरेल आणि लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये हा व्हायरस 100 टक्के पसरण्याची शक्यता आहे.
लसीमुळे संसर्ग कमी होण्यासाठी मदत मिळेल
डॉ. कोएत्झी म्हणाले की, सध्याच्या लसींमुळे संसर्ग कमी होण्यासाठी खूप मदत मिळेल कारण आम्हाला माहित आहे की जर तुमचं लसीकरण झालं असेल किंवा तुम्हाला याआधी कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्ही फक्त एक तृतीयांश संसर्ग पसरवाल. मात्र लसीकरण न झालेल्या नागरिकांना 100 टक्के धोका असेल. पुढे ते म्हणाले की, कोविड-19 ची जागतिक महामारी अद्याप संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक (स्थानिक स्थरावर पसरणारं संक्रमण) होईल. तुलनेने कमकुवत स्वरूप असलेल्या ओमिक्रॉनच्या येण्याने कोविड-19 संपणार आहे, या काही तज्ञांच्या मताशी ते असहमत आहेत.
कोरोना लस घेतलेल्यांनाच Omicron ने गाठलं; ओमिक्रॉनबाधितांपैकी 91 टक्के Vaccinated
भारतात ओमिक्रॉनच्या एकूण 415 केसेस
भारतात शनिवारपर्यंत कोरोनाच्या या ओमिक्रॉन वेरिएंटची एकूण 415 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 115 लोक बरे झाले आहेत किंवा बाहेर गेले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 108 रुग्ण आढळले आहेत. यानंतर दिल्लीत 79, गुजरातमध्ये 43, तेलंगणात 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34 आणि कर्नाटकमध्ये 31 रुग्ण आढळले आहेत.
भारतात मोठ्या संख्येने संक्रमण होईल
डॉ. कोएत्झी यांनी भीती व्यक्त केली की, भारतातील ओमिक्रॉनमुळे कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होईल आणि मोठ्या संख्येने लोक संक्रमित होतील. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे सौम्य असणे अपेक्षित आहे, जसे आपण दक्षिण आफ्रिकेत पाहत आहोत. अनियंत्रित प्रत्येक विषाणू मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो. ओमिक्रॉन मुलांना देखील संक्रमित करत आहे.
Delta, Omicron नंतर Delmicron; किती धोकादायक आहे कोरोनाचा Double Variant?
ओमिक्रॉन भविष्यात स्वरुप बदलून अधिक प्राणघातक होण्याची शक्यता
डॉ. कोएत्झी म्हणाले की, ओमिक्रॉन सध्या धोकादायक नाही फक्त तो वेगाने पसरत आहे. परंतु रुग्णालयांमध्ये गंभीर केसेस तुलनेने कमी आहेत. चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांना देखील संसर्ग होत आहे, परंतु ते सरासरी पाच ते सहा दिवसांत बरे होत आहेत. मात्र ओमिक्रॉन भविष्यात त्याचे स्वरूप बदलून अधिक प्राणघातक बनू शकते आणि असंही शक्य आहे की असं होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.