फेसबुकने हटवलेल्या पेजेसवर नेमकं होतं तरी काय?

फेसबुकने हटवलेल्या पेजेसवर नेमकं होतं तरी काय?

2017 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी ही पेजेस सुरू करण्यात आली. गुजरातमधल्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करून स्थानिक भाषेत हो मजकूर पसरवला जात होता. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करताना त्यात बदनामीकारक मजकूरही लिहिला गेला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 एप्रिल : निवडणुकीच्या धामधुमीत फेसबुकने राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजेस आणि अकाउंट्सवर मोठी कारवाई केली आहे. या पेजेसवरून चुकीची माहिती प्रसारित केली जात होती. तसंच विरोधकांचा अपप्रचारही केला जात होता. अशी सुमारे ७०० अकाउंट्स फेसबुकने हटवली आहेत. यात काँग्रेससोबतच भाजपच्याही फेसबुक पेजेसचा समावेश आहे. या अकाउंट्सवरून फेक न्यूज पसरवल्या जात होत्या, असं फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी सेलने म्हटलं आहे.

फेसबुकच्या या पेजेसमध्ये भाजप किंवा काँग्रेसच्या अधिकृत पेजेसचा समावेश नाही. पण या पक्षांना समर्थन देणाऱ्या काही व्यक्ती आणि संस्थांनी फेक अकाउंट्स उघडली होती. जी पेजेस हटवण्यात आली आहेत त्यात 138 फेसबुक पेज आणि 549 फेक अकाउंट्स आहेत. या लोकांनी आपली ओळख लपवून फेक न्यूज पसरवणं सुरू ठेवलं होतं.

काय आहे सिल्व्हर टच ?

2017 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी ही पेजेस सुरू करण्यात आली. गुजरातमधल्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करून स्थानिक भाषेत हो मजकूर पसरवला जात होता. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करताना त्यात बदनामीकारक मजकूरही लिहिला गेला होता.

फेसबुकच्या आकडेवारीनुसार, 2 लाख 6 हजार लोकांनी या पेजेस ना फॉलो केलं होतं. ऑगस्ट 2014 ते मार्च 2019 या काळात या पेजेसवर 27 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले. 'सिल्व्हर टच' नावाची एक आयटी फर्म ही पेजेस चालवत होती. याच आय टी फर्म ने नरेंद्र मोदी अॅप बनवलं होतं. अहमदाबाद, बडोदा, सुरत, लखनौ, कोलकाता, बंगळुरू यासोबतच यूएस, यूके आणि फ्रान्समध्येही त्यांची कार्यलयं होती.

ही फेक अकाउंट्स आणि फेसबुक पेजेसवर काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर होता. ही पेजेस आता फेसबुकने हटवल्यामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसला आहे.

फेसबुक, गुगल यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एक आचारसंहिता जारी केली आहे. खोटी माहिती पसरवणारी अकाउंट्स आणि फेसबुक पेजेसवर केलेली कारवाई हा याच मोहिमेचा एक भाग आहे.

=========================================================================================================

VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले


<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-357807" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzU3ODA3/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या