काय होता इंदिरा गांधींचा 'गरिबी हटाव' कार्यक्रम ?

काय होता इंदिरा गांधींचा 'गरिबी हटाव' कार्यक्रम ?

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये 'गरिबी हटाव' चा नारा दिला होता. या घोषणेमुळे त्या निवडणुकीत त्यांना यशही मिळालं. आता राहुल गांधींनी पुन्हा हा नारा देत 'न्याय' योजना जाहीर केली आहे. या योजनेचं भवितव्य काँग्रेसच्या निवडणुकीतल्या कामगिरीवर अवलंबून आहे.

  • Share this:

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी इंदिरा गांधींच्या शैलीत 'गरिबी हटाव'चा नारा देत 'न्याय' योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार,दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

1971 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी 'गरिबी हटाव' चा नारा दिला होता. या घोषणेमुळे 1971 च्या निवडणुकीत त्यांना जोरदार यश मिळालं होतं पण आता राहुल गांधींनी केलेल्या घोषणेचा काँग्रेसला किती फायदा होणार हा प्रश्नच आहे.

त्यावेळी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरिबीचा दर 57 टक्के होता. ही गरिबी हटवण्यासाठी इंदिरा गांधींनी अनेक योजना जाहीर केल्या. या योजनांचा भर शेतकरी आणि मजूरांवर होता. भारतातला सगळ्यात गरिब असलेल्या ओडिशामधल्या कालाहंडी जिल्ह्यातून इंदिरा गांधींनी 'गरिबी हटाव' चा नारा दिला.

अल्पभूधारक शेतकरी, मजूर यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या योजनांची मदत झाली. 1975मध्ये इंदिरा गांधींनी गरिबी निर्मूलनासाठी 20 कलमी कार्यक्रमच जाहीर केला.

निवडणुकीत यश

यामध्ये वस्तूंच्या किंमती घटवणं, छोटे शेतकरी, कामगार यांच्या कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी कायदा आणणं, सरकारी खर्चात कपात, गावपातळीवरच्या लोकांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणं हे सगळे मुद्दे यात होते.

1977 मध्ये भारतात गरिबीचा दर 52 टक्के होता.त्यानंतर मात्र गरिबीचा दर कमी झाला. 1983 मध्ये हा दर 44 टक्के एवढा खाली आला. असं असलं तरी उत्तर प्रदेशात मात्र गरिबीचं प्रमाण खूप होतं. 1971 मध्ये या राज्यात 65 टक्के एवढी गरीबी होती. आता हा दर 32 टक्क्यांवर खाली आला आहे.

1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक प्रस्ताव काढून जगातलं दारिद्र्य नष्ट करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर दरवर्षी 17 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिवस पाळला जातो.पण या घोषणेची सुरुवात इंदिरा गांधींनी अनेक वर्षं आधी भारतात केली होती.

काँग्रेसने मनरेगा यशस्वी करून दाखवली आणि 'न्याय'योजना हा त्याचाच पुढचा टप्पा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. पण काँग्रेस ही योजना कशी राबवणार याबदद्ल मात्र त्यांनी काही स्पष्ट केलं नाही. काँग्रेसचा तपशीलवार जाहीरनामा नंतर येणार आहे पण ही योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातली प्रमुख योजना असणार आहे. या योजनेचं भवितव्य मात्र काँग्रेसच्या या निवडणुकीतल्या कामगिरीवर अवलंबून आहे.

====================================================================================================================================

राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

First published: March 25, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading