मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वातंत्र्यदिनानंतर घरी लावलेल्या राष्ट्रीय ध्वजाचं काय करायचं? तिरंग्याचा अवमान केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो

स्वातंत्र्यदिनानंतर घरी लावलेल्या राष्ट्रीय ध्वजाचं काय करायचं? तिरंग्याचा अवमान केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो

Indian Flag: राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेल्यास मात्र तीन वर्ष तुरुंगवास आणि पहिल्यांदा गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. 26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली.

Indian Flag: राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेल्यास मात्र तीन वर्ष तुरुंगवास आणि पहिल्यांदा गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. 26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली.

Indian Flag: राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेल्यास मात्र तीन वर्ष तुरुंगवास आणि पहिल्यांदा गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. 26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली.

मुंबई, 16 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (75 वर्षं) ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी त्यांच्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवून हा उत्सव जल्लोषात साजरा केला. आता ध्वज संहितेतील (Flag Code) तरतुदींनुसार, खराब झालेल्या किंवा फाटलेल्या ध्वजांची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्याचं आवाहन दिल्ली महानगरपालिकेनं (Municipal Corporation Of Delhi) केलं आहे. तिरंगा ध्वजाचा सन्मान आणि आदर राखत नागरिकांनी खराब झालेले, विखुरलेले ध्वज विभागीय स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspectors) किंवा सफाई सैनिकांच्या मदतीनं महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात जमा करावेत, असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय ध्वज संहितेचं कुठल्याही स्थितीत उल्लंघन होऊ नये, यासाठी दिल्ली महापालिका कटिबद्ध आहे. त्यामुळे फाटलेले, खराब झालेले तसंच विखुलरलेल्या ध्वजांची व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेनं घेतली आहे. प्रत्येक नागरिकानेही ध्वज संहितेचं पालन करून ध्वजाप्रती आदर व सन्मान दाखवावा, असं आवाहन एका निवेदनामार्फत करण्यात आलं आहे. दिल्लीतील नागरिकांच्या सोयीसाठीही सदरील पाऊल उचलल्याचं यात म्हटलं आहे.

75th Independence Day : राम चरण ते विजय देवरकोंडा, साउथ सुपरस्टार्सनी असा साजरा केला 15 ऑगस्ट

भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, ध्वज जमा करणं, ठेवणं आणि त्यांची व्यवस्था करण्यासाठी दिल्ली महापालिकेनं त्यांच्या विभागीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन केले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2022 ला ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत उत्सव साजरा केल्यानंतर नागरिकांनी स्वच्छता निरीक्षकांमार्फत राष्ट्रीय ध्वज जमा करावेत. महापालिकेच्या वेबसाइटवर परिसरातील स्वच्छता निरीक्षक, सहायक स्वच्छता निरीक्षक तसंच सफाई सैनिकांचे फोन नंबर देण्यात आले आहेत. नागरिक फोनवर थेट संपर्क साधून ध्वज जमा करू शकतात. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत नागरिकांना राष्ट्रीय ध्वज देण्यात आले होते. ही मोहीम सोमवारी (15 ऑगस्ट 2022) ला संध्याकाळी संपली असून, ध्वज जमा करण्याचं आवाहन निवेदनामार्फत करण्यात आलं आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेत चक्क कावळाही सहभागी; अत्यंत विलोभनीय असा Video

राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी ध्वजसंहिता 2002 चं पालन करावं लागतं. या संहितेच्या कलमानुसार, सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकवण्यावर बंदी नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेल्यास मात्र तीन वर्ष तुरुंगवास आणि पहिल्यांदा गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. 26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली. या आधी राष्ट्रीय प्रतीक अपमानविरोधी कायदा 1971 अस्तित्वात होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नागरिकांना साजरा करता यावा यासाठी काही 20 जुलै 2022 ला ध्वज संहितेत बदल करण्यात आले आहेत. सोमवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा यासाठी दिल्ली महापालिकेनं हे पाऊल उचललं आहे.
First published:

Tags: Delhi, India

पुढील बातम्या