मराठी बातम्या /बातम्या /देश /ट्रेनचं कन्फर्म तिकीट हरवलं, तर कसा करणार प्रवास? जाणून घ्या नियम

ट्रेनचं कन्फर्म तिकीट हरवलं, तर कसा करणार प्रवास? जाणून घ्या नियम

विनातिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल दंडही होतो; पण समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट (Indian Railways Ticket) काढलंय आणि ते ऐन वेळी हरवलं तर तुम्ही काय करणार?

विनातिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल दंडही होतो; पण समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट (Indian Railways Ticket) काढलंय आणि ते ऐन वेळी हरवलं तर तुम्ही काय करणार?

विनातिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल दंडही होतो; पण समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट (Indian Railways Ticket) काढलंय आणि ते ऐन वेळी हरवलं तर तुम्ही काय करणार?

    मुंबई, 7 जुलै : तुम्ही बस अथवा ट्रेनने विनातिकीट प्रवास केलाय का कधी? काही जणांनी नक्कीच केला असेल; पण जवळच्या ठिकाणी. विनातिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल दंडही होतो; पण समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट (Indian Railways Ticket) काढलंय आणि ते ऐन वेळी हरवलं तर तुम्ही काय करणार? विनातिकीट प्रवास करणं हा काही त्यावरचा पर्याय नाही. तुमचं ट्रेनचं तिकीट हरवल्यानंतर प्रवास करण्यासाठी काय पर्याय आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

    तुमचं ट्रेन तिकीट हरवलं असेल, तरीही तुम्हाला प्रवास करता येतो. त्यासाठी भारतीय रेल्वेने तुम्हाला डुप्लिकेट तिकीट (duplicate ticket) घेण्याचा पर्याय ठेवला आहे. तुमचं तिकीट हरवल्यास तुम्ही डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता; मात्र त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. भारतीय रेल्वेच्या indianrail.gov.in या वेबसाइवर दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्हेशन चार्ट तयार होण्यापूर्वी कन्फर्म तिकीट हरवल्याचं तुम्ही रेल्वेला कळवलं, तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट देण्यात येतं. सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासचं तिकीट हरवल्यास तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. अन्य क्लासचं तिकीट हरवल्यास 100 रुपये मोजावे लागतील. रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट हरवलं तर एकूण तिकीटच्या 50 टक्के पैसे घेऊन डुप्लिकेट तिकीट देण्यात येतं.

    डुप्लिकेट तिकीटबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा

    समजा, तुमचं तिकीट कन्फर्म आहे आणि ते फाटलं असेल तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळू शकतं. त्यासाठी रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर तिकिटाच्या एकूण रकमेच्या 25 टक्के भाडं तुम्हाला भरावं लागतं. चार्ट तयार होण्याआधी अर्ज केल्यास तिकीट हरवल्यानंतर जेवढं शुल्क आकारलं जातं, तेच आकारलं जाईल. म्हणजेच तुमचं तिकीट हरवलं अथवा फाटलं तर तुम्हाला डुप्लिकेट तिकिटासाठी खर्च करावा लागेल.

    भारतीय रेल्वेची डुप्लिकेट तिकीट सुविधा केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांसाठी आहे. वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांना किंवा RAC तिकीट असलेल्यांना डुप्लीकेट तिकीट दिलं जात नाही. कारण वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांचं नाव रिझर्व्हेशन चार्टमध्ये देण्यात येत नाही.

    तपशीलांच्या आधारे तिकिटाची सत्यता व पडताळणी केल्यास, फाटलेल्या तिकिटांवरही रिफंड देण्यात येतो. ज्या लोकांचे तिकीट RAC आहे. त्यांनाही तिकीट हरवल्यास रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर डुप्लिकेट तिकीट दिलं जात नाही. त्यामुळे तुमचं तिकीट RAC असेल आणि प्रवास करताना हरवल्यास तुम्हाला दुसरं डुप्लिकेट तिकीट दिलं जाणार नाही. त्यामुळे आपलं ओरिजिनल तिकीट सांभाळून ठेवा.

    तिकीट हरवल्यामुळे तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी अर्ज केला. मात्र, त्यानंतर तुमचं तिकीट सापडलं तर दोन्ही तिकीट्स ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांना दाखवली, तर त्यानंतर तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी भरलेली रक्कम तुम्हाला 5 टक्के कपातीसह परत दिली जाते.

    तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमचं तिकीट जपून ठेवा. कारण तिकीट हरवल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळेल; पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आपलं ओरिजिनल तिकीट सांभाळून ठेवलेलं कधीही चांगलं.

    First published:
    top videos

      Tags: Indian railway