• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • पण त्या मुली समुद्रावर गेल्याच कशासाठी? गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या सवालाने नवा वाद

पण त्या मुली समुद्रावर गेल्याच कशासाठी? गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या सवालाने नवा वाद

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर काय करत होत्या, असा सवाल मुख्यमंत्र्यांनीच विचारल्यामुळे जोरदार वादाला तोंड फुटलं आहे.

  • Share this:
    पणजी, 29 जुलै : गोव्यात (Goa) झालेल्या गँगरेप प्रकरणावरून (Gang rape case) गोंधळ सुरू असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी बलात्कार झालेल्या मुली रात्रीच्या वेळी बीचवर का गेल्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेनॉलिम (Benolim) बिचवर फिरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर चार नराधमांनी बलात्कार केला. आपण पोलीस असल्याचं सांगत त्यांनी या मुलींसोबत असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना जबर मारहाण केली. या घटनेचे जोरदार पडसाद गोव्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. गोव्याचे समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी सुरक्षित राहिले नसल्याची टीका विरोधकांनी सुरु केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मुलींवर आणि तिच्या पालकांनी केलेल्या संस्काराबाबत प्रश्न उपस्थित केले. काय म्हणाले मुख्यमंत्री? अल्पवयीन मुली रात्रभर घराबाहेर का होत्या, त्या समुद्रकिनाऱ्यावर काय करत होत्या, याचा विचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. या मुलींच्या आईवडिलांनी आपल्या मुलींना रात्रभर समुद्रकिनारी राहण्याची परवानगी कशी दिली, या प्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे. मुलं ऐकत नाहीत, हे कारण सांगत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. जर 14 वर्ष वयाच्या मुली रात्रभर घराबाहेर फिरत असतील, तर त्यांच्या आईवडिलांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. हे वाचा -... आणि 20 वर्षांचं आयुष्य त्याच्या स्मृतीतून अचानक पुसलं गेलं! नेमकं घडलं काय? पार्टी करण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या 10 तरुणांपैकी 6 जण रात्री घरी परत गेले. मात्र केवळ चौघेच समुद्रकिनारी थांबले. त्यातील दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आणि या मुलींवर अत्याचार करण्यात आले. पोलीस असल्याची बतावणी कऱणाऱ्या आरोपींपैकी एक सरकारी कर्मचारी असल्याची माहिती आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published: