मराठी बातम्या /बातम्या /देश /पंतप्रधान मोदींच्या बॉडीगार्डकडे असलेल्या काळ्या ब्रिफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या

पंतप्रधान मोदींच्या बॉडीगार्डकडे असलेल्या काळ्या ब्रिफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या

India's PM Bodyguard: भारतीय अण्वस्त्रे कधी आणि कशी वापरायची हे ठरवण्याची मक्तेदारी देशाच्या पंतप्रधानांकडे नाही.

India's PM Bodyguard: भारतीय अण्वस्त्रे कधी आणि कशी वापरायची हे ठरवण्याची मक्तेदारी देशाच्या पंतप्रधानांकडे नाही.

India's PM Bodyguard: भारतीय अण्वस्त्रे कधी आणि कशी वापरायची हे ठरवण्याची मक्तेदारी देशाच्या पंतप्रधानांकडे नाही.

  नवी दिल्ली, 26 मे : देशाचे पतंप्रधान हे त्या देशाचे प्रमुख असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च करण्यात येतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सुरक्षा एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (Special Protection Group) कमांडो करतात. पंतप्रधान मोदी कुठेही जाताना हे कमांडो त्याच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत असतात. तुम्ही जर मोदींना त्यांच्या बॉडीगार्डसह (Bodyguard) पाहिलं असेल तर, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे त्या बॉडीगार्ड्सच्या हातात असलेली काळ्या रंगाची ब्रिफकेस (Black Briefcase). ही काळ्या रंगाची ब्रिफकेस दिसायला अगदी लहान आणि कमी जाडीची असते. परंतु, एवढ्याशा या ब्रिफकेसमध्ये नक्की असतं तरी काय? या ब्रिफकेसमध्ये मोदींचे भाषण, महत्त्वाच्या फाइल्स (Important Files) किंवा सरकारी कागदपत्रं आहेत, असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. तर या ब्रिफकेसमध्ये नेमकं काय असतं, हे जाणून घेऊयात.

  SPG जवान FNF-2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि 17-M सारख्या पिस्तुलांनी सज्ज असतात. त्यांच्याकडे एक ब्रिफकेस असते. हे ब्रिफकेस एक प्रकारचं न्यूक्लियर बटण (Nuclear Button) असतं, जे पंतप्रधानांपासून काही फूट अंतरावर ठेवलेलं असतं आणि ते दिसायला अतिशय छोटं वाटतं. हे पोर्टेबल बुलेट प्रूफ शील्ड किंवा पोर्टेबल फोल्ड केलेले बॅलिस्टिक शील्ड (Ballistic Shield) आहे जे हल्ला झाल्यास उघडलं जाऊ शकतं. हे NIG लेव्हल 3 चं संरक्षण प्रदान करतं. जेव्हाजेव्हा सुरक्षा दलांना काही संशयास्पद हालचाली दिसतात, तेव्हा ते सुरक्षेसाठी ही ब्रिफकेस खालच्या दिशेने हलवतात आणि ती उघडून पंतप्रधानांसाठी एक कवच तयार करते. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास व्हीव्हीआयपींना त्वरित संरक्षण देण्यासाठी ही ब्रिफकेस ढाल म्हणून काम करते. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिलंय.

  PM मोदींचे 24 तास : साडेतीन तास झोप, 18 तास काम, सकाळी या गोष्टीने करतात दिवसाची सुरुवात

  या सुटकेसमध्ये एक सिक्रेट पॉकेटही (Secret Pockets) आहे ज्यामध्ये पिस्तूल ठेवलं जातं. खरं तर भारतीय अण्वस्त्रं कधी आणि कशी वापरायची हे ठरवण्याची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांकडे नाही. ते वापरण्याचा अधिकार फक्त न्यूक्लियर कमांड अथॉरिटीला (Nuclear Command Authority) आहे. तिथे एक काउंटर असॉल्ट टीम (CAT) देखील आहे जी SPG सोबत त्वरित रिस्पॉन्स देणारी टीम आहे. ही टीम FN-2000, P-90, Glock-17, Glock-19 आणि FN-5 सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र वापरते. या टीमला कठोर प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केलं जातं आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानांवर जर हल्ला झाला तर हे कमांडो SPG सोबत मिळून त्वरित कारवाई करतात आणि पंतप्रधानांना सुरक्षितस्थळी घेऊन जातात. SPG जगभरातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनाही सुरक्षा पुरवते, त्याशिवाय ते राजकीय दौऱ्यावर असलेल्या देशातील इतर मान्यवरांनाही सुरक्षा पुरवतात.

  First published:

  Tags: Pm modi