कोरोनामुळे मृत्यूची किती टक्के आहे शक्यता? काय आहे जगातल्या तज्ज्ञांचं मत?

कोरोनामुळे मृत्यूची किती टक्के आहे शक्यता? काय आहे जगातल्या तज्ज्ञांचं मत?

वय जेवढं जास्त असेल तेवढा धोका जास्त असतो. ज्यांना ह्रदयविकार, हाय डायबेटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर आजार असतात त्यांना कोरोना झाल्यास ही शक्यता वाढू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मार्च :  सर्व जग सध्या कोरोना व्हायरसने भयग्रस्त आहे. लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या व्हायरसविषयी जगभर सर्व संस्था आणि सरकारे प्रचंड जनजागृती करत आहे. तरीही कोरोनाविषयी समाजांपेक्षा गैरसमजच जास्त असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. कोरोना झाला म्हणजे मृत्यूच होतो अशी सर्वात मोठी भीती लोकांमध्ये आहे. मात्र हे 100 टक्के खरं नाही असं तज्ज्ञांनी सांगितलंय. कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता ही 1 टक्के असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

वय जेवढं जास्त असेल तेवढा धोका जास्त असतो. ज्यांना ह्रदयविकार, हाय डायबेटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर आजार असतात त्यांना कोरोना झाल्यास ही शक्यता वाढू शकते. तर तरुणांमध्ये कोरोनातून बरे होण्याची शक्यता आणखी वाढते असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

सध्या जगभर यावर संशोधन सुरू असून अजुनही ठोस निष्कर्ष निघू शकलेले नाहीत. चीन नंतर इराण, इटली, स्पेन, अमेरिका आणि जर्मनीमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

GOOD NEWS : 96 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात, दिला हा सल्ला

कोरोनामुळे मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज   Johns Hopkins Universityच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मृत्यूची संख्या जास्त असलेले पहिले 5 देश

 Italy - 7,503

Spain 3,647

 Hubei China - 3,169

 Iran - 2,077

 France - 1,331 deaths

अशी आहे बाधितांची आकडेवारी

81,736 China

74,386 Italy

69,197 US

49,515 Spain

37,323 Germany

हा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाव्हायरस लवकरच मरेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

ट्रकवर उभारले जातेय शवगृह, लवकरच 'या' शहरात पडणार मृतांचा खच

मायकल यांच्या मते, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा आधीच संपला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत 21 हजार लोकांचा मृत्यू झाला असला तरी 1 लाखांहून अधिक लोक निरोगीही झाले आहेत. त्यामुळं कोरोनावर मात करू शकतो, अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

वुहानपेक्षा 'या' शहरात भयंकर परिस्थिती, दर मिनिटाला जातोय एकाचा जीव

लॉस एंजेलिस टाईम्सशी केलेल्या संभाषणात मायकल यांनी, "परिस्थिती जितकी भीतीदायक वाटत आहे तेवढी नाही आहे. चीनमध्ये 78 हजार लोक निरोगी झाले आहे. म्हणजे कोरोना विषाणू लवकरच मरू शकतो, यावर विश्वास आहे", असे सांगितले. अनेक आरोग्य तज्ञांचा असा दावा केला होता की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल, मात्र गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

First Published: Mar 26, 2020 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading