तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ काय म्हणतंय?

न्या.कुरियन जोसेफ, न्या. रोहिंटन नरिमन, न्या.यू.यू. ललित आणि न्या.अब्दुल नझीर हे सगळ्या धर्मांचे न्यायाधीश या खंडपीठात होते. प्रत्येक न्यायाधीशाने आपले म्हणणे स्वतंत्रपणे मांडले. तर या प्रत्येक न्यायाधीशाचे मत जाणून घेऊ या.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2017 12:41 PM IST

तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ काय म्हणतंय?

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: तिहेरी तलाक रद्द करणारा ऐतिहासिक निर्णय आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.  हा निकाल 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे. सरन्यायाधीश खेहार, न्या.कुरियन जोसेफ, न्या. रोहिंटन नरिमन, न्या.यू.यू. ललित आणि न्या.अब्दुल नझीर हे सगळ्या धर्मांचे न्यायाधीश या खंडपीठात होते. प्रत्येक न्यायाधीशाने आपले म्हणणे स्वतंत्रपणे मांडले. तर या प्रत्येक न्यायाधीशाचे मत जाणून घेऊ या.

1.न्यायाधीश कुरिअन जोसेफ-इस्लामिक कायद्याचे चार स्त्रोत आहेत. कुराण हा त्यातील पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्त्रोत आहे. बाकीचे स्त्रोत हे कुराणाला  पूरक आहेत.कुराणात जे लिहिलं आहे त्याहून जास्त महत्त्वाचं काहीही असू शकत नाही.  लग्न  टिकावं असा कुराणचा आग्रह आहे.   तिहेरी तलाक  कुराणाच्या  सिद्धांताच्या विरोधात आहे.

2.न्यायाधीश रोहिंटन फाली नरिमन- तिहेरी तलाक हा घटस्फोटाची अमान्य पद्धत आहे. हनाफी कायदाही तिहेरी तलाकला एक पाप मानतो. 1937चा कायदा तिहेरी तलाकला मान्यता देतो त्यामुळे तिहेरी तलाक कलम 13चे उल्लंघन करत नाही. पण तिहेरी तलाक कलम 13 (1)चे उल्लंघन करतो.जेव्हा याचिकाकर्ते कोर्टात येतात तेव्हा हाताची घडी बांधून बसणं कोर्टाला शक्य नाही.त्यामुळे ही प्रथा कायदेशीर आहे की नाही यावर कोर्टाला निर्णय द्यावाच लागेल.

 3.न्यायाधीश सी.जे.खेहार- तिहेरी तलाक हा सुन्नी पंथाच्या हनाफी शाखेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या संस्कृतीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तो नाकारता येणार नाही.तिहेरी तलाक संविधनाच्या  कलम 25, 14 आणि 21  यांचे उल्लंघन करत नाही.ही प्रथा पर्सनल लॉचा एक भाग असल्यामुळे न्यायिक हस्तक्षेपाने तिच्यात काही बदल करता येणार नाही. संसदीय हस्तक्षेपानेच तिहेरी तलाकच्या बाबतीत काही बदल करता येईल.

4. न्यायाधीश यू.यू .ललित-कुरिअन जोसेफ यांच्या म्हणण्याला सहमती दिली

Loading...

5. न्यायाधीश अब्दुल नझीर-खेहार यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला

अखेर 3 न्यायाधीशांचं म्हणणं तिहेरी तलाक रद्द करावा असं होतं तर दोन न्यायाधीशांना असं करता येणार नाही असं वाटत होतं.त्यामुळे 3-2 अशा मेजोरिटीने तिहेरी तलाक रद्द करण्यात आला.

खंडपीठ काय म्हणालं? 

- इस्लाममध्ये कुराण हाच कायद्याचा पहिला स्रोत

- कुराणमध्ये जे लिहिलंय त्याशिवाय काही महत्त्वाचं नाही

- लग्न टिकावं यासाठी कुराणमध्ये आग्रह

- तिहेरी तलाक कुराणाच्या सिद्धांताच्या विरोधात आहे

- तिहेरी तलाक हा धर्माचा भाग असल्याचं अमान्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 12:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...