युद्ध कैद्यांसाठीचा काय आहे जीनिव्हा करार?

युद्ध कैद्यांसाठीचा काय आहे जीनिव्हा करार?

जिनेव्हा करारानुसार अशा युद्धकैद्याला कशी वागणूक द्यावी याचे काही नियम ठरले असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी :  भारताचा विंग कमांडर अभिनंदन हा पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं भारतान म्हटलं आहे. अभिनंदनची  तातडीने आणि सुरक्षीत सुटका करावी अशी मागणीही भारताने केली आहे. पाकिस्तानी लष्कराने ज्या बिभत्सपणे त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावरही परराष्ट्रमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. जिनेव्हा करारानुसार अशा युद्धकैद्याला कशी वागणूक द्यावी याचे काही नियम ठरले असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास त्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वाळीत टाकले जाते.

असा आहे करार

सैनिक पकडलेल्या क्षणी करार लागू होतो.

युद्धकैदी कुणाला म्हणावं आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे आंतरराष्ट्रीय नियमही लागू होतात .

युद्धकैदयाला धर्म,जात, जन्माबद्दल विचारता येत नाही.

नाव, सैन्यातलं पद, नंबर आणि युनिटबद्दल चौकशी शक्य .

युद्धकैदी सैनिकाची जबरदस्तीनं चौकशी करता येत नाही.

युद्धकैद्याला खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधा देणं अनिवार्य.

युद्धकैद्याला गुन्हेगार म्हणून वागणूक देता येत नाही.

कैद्यांना कायदेशीर मदत देणं बंधनकारक.

युद्धकैद्यांवर खटला चालवला जाऊ शकतो.

युद्ध संपल्यानंतर युद्धकैद्यांना मायदेशाच्या हवाली करणं बंधनकारक.

दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांचा मुद्दा गाजल्यानंतर 1949 साली 194 देशांकडून कराराला मान्यता.

अशी झाली होती नचिकेताची सुटका

कारगिल युद्धाच्या वेळी पायलट नचिकेत पाक सैन्याच्या ताब्यात.

एका आठवड्यानंतर पाकिस्तानन त्यांना भारतात परत पाठवलं.

3 जून 1999 रोजी कारगिल युद्धावेळी मिग-27 चे ते पायलट होते.

त्यांच्या विमानाचं इंजिन खराब होऊन क्रॅश झालं.

पाकिस्तानी सैन्यानं त्यांना कैद केलं होतं.

नचिकेत यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला.

त्यांची सुटका पाकमधले भारताचे माजी उच्चायुक्त जी.पार्थसारथी यांनी केली होती.

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरिफांनी केली होती सुटकेची घोषणा.

नचिकेत यांची सुटका करून पाकनं आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला.

VIDEO : राहुल गांधींनी मोदींबद्दल व्यक्त केली 'ही' नाराजी

First published: February 27, 2019, 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading