Elec-widget

काय आहे नरेंद्र मोदींचा 100 दिवसांचा अजेंडा?

काय आहे नरेंद्र मोदींचा 100 दिवसांचा अजेंडा?

लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला मागच्या निवणुकीएवढं यश मिळेल का, असं विचारलं जात आहे. पण निकाल येण्यापूर्वीच मोदींनी आपला 100 दिवसांचा अजेंडा तयार केल्याचं वृत्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला मागच्या निवणुकीएवढं यश मिळेल का, असं विचारलं जात आहे. पण निकाल येण्यापूर्वीच मोदींनी आपला 100 दिवसांचा अजेंडा तयार केल्याचं वृत्त आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं आहे. मतदानाचे हे सात टप्पे 19 मे पर्यंत चालतील. 23 मे ला या निवडणुकांचे निकाल येणार आहेत. आपलं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास नरेंद्र मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागार या तिन्ही घटकांना हा अजेंडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

GDP चा दुहेरी आकडा

या अजेंड्यानुसार GDP चा दुहेरी आकडा गाठण्याचं लक्ष्य आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, तीन मोठ्या विभागांच्या अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आहेत. आर्थिक क्षेत्रात आणि नोकरशाहीमध्ये व्यापक सुधारणा करण्याची जबाबादारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

मोदींच्या या अजेंड्यामध्ये तेल आणि गॅस, पायाभूत संरचना आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2047 साली जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षं पूर्ण होतील तेव्हा भारत पूर्णपणे विकसित देश बनलेला असेल, असा संकल्प मोदींनी केला आहे. विकास आणि रोजगारावर भर देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Loading...

देशातल्या नद्या जोडणार

देशातल्या नदीजोड प्रकल्पालाही प्राधान्य दिलं जाणार आहे.ब्रह्मपुत्रा नदीवर चीन धरण बांधत असल्यामुळे भारताला सिंधु नदीच्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याचाही विचार सुरू आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होतं. आता भारतातले मतदार पुन्हा एकदा मोदींना संधी देतात का ते पाहावं लागेल.

===================================================================================================================================================================

VIDEO: खुशखबर! मान्सूनबाबत हवामान विभागानं काय वर्तवला अंदाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...