मराठी बातम्या /बातम्या /देश /

काय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या

काय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या

aadhaar card

aadhaar card

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधारकार्ड (aadhar card )युआयडीआयने जारी केल आहे.

नवी, दिल्ली, आधार कार्ड (Aadhaar Card) हा भारतीय नागरिकांसाठी असलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्डमार्फत अनेक काम एका मिनिटात होतात. मात्र तुम्हाला निळ्या रंगाचे आधार कार्ड (Blue Color Aadhaar Card) माहिती आहे का? काय आहे ब्लू कलर कार्ड आधारकार्ड पाहूयात. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असलेले आधार कार्ड UIDAI कडून दिले जाते. यात आपले बायोमेट्रिक आणि डेमोग्राफीक्सची संपूर्ण माहिती असते. अनेक ठिकाणी आधार कार्ड हे अॅड्रेस प्रुफ म्हणून देखील दाखवता येते.

साधारण आधार कार्ड दोन प्रकारचे असतात. एक रेग्युलर आधार कार्ड जे देशातील सर्व नागरिकांसाठी आहे. ब्लू आधार कार्ड सफेद कागदावर प्रिंट होऊन येते. तर दुसरे आधार हे लहान मुलांसाठी असते त्याचा रंग निळा म्हणजेच ब्लू असतो. लहान मुलांच्या आधार कार्डला ब्लू कलर आधार असे म्हणतात.

2018 मध्ये, भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) 5 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलांची माहिती घेतली आणि खास 'बाल आधार' कार्ड (Bal Aadhaar Card) सुरू केले. नेहमीसारख्या पांढऱ्या आधार कार्डऐवजी मुलांसाठीच्या आधार कार्डचा रंग निळा ठेवण्यात आला आहे. मुलांनी वयाची 5 वर्षे ओलांडल्यानंतर हे ब्लू आधार कार्ड अवैध ठरते. त्यानंतर बायोमेट्रिक्स अपडेट करणे अनिवार्य असून, 15 व्या वर्षी पुन्हा एकदा अपडेट करणे गरजेचे असते.

हे निळे आधार कार्ड (Blue Aadhaar Card) नियमित आधार कार्डपेक्षा अनेक बाबींमध्ये वेगळे आहे. हे फक्त 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे त्याचबरोबर या बाल आधार कार्डमध्ये मुलाची बायोमेट्रिक माहिती नसते.

हे निळे आधार कार्ड घेण्यासाठीची प्रक्रिया ही नियमित आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच आहे. पालकांना नोंदणीसाठी एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, नात्याचा पुरावा आणि मुलाच्या जन्मतारखेची कागदपत्रे आवश्यक असतील. मुलांचे शाळेचे आयडी कार्ड, जन्म दाखला किंवा हॉस्पिटलची डिस्चार्ज स्लिप वैध पुरावा म्हणून सादर करू शकतात.

हे निळे आधार कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अशी आहे:

-सर्व प्रथम आपल्या मुलासह जवळच्या आधार नावनोंदणी केंद्रावर जा. सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्यास विसरू नका. नावनोंदणी फॉर्म भरा.

-त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड देण्यास सांगितले जाईल.

- तुमचा फोन नंबर दया. त्यावर ब्लू आधार कार्ड जारी केले जाईल.

- बायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नसल्यामुळे, मुलाचा फक्त एक फोटो घेतला जाईल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

- कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तसा मेसेज तुम्हाला येईल.

- पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत, तुमच्या मुलाला निळे आधार कार्ड दिले जाईल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone