12 तासात काय घडलं बिहारमध्ये? पाहा संपूर्ण घटनाक्रम

12 तासात काय घडलं बिहारमध्ये? पाहा संपूर्ण घटनाक्रम

बिहारमध्ये क्षणोक्षणी राजकीय समीकरणं कशी बदलत गेली याचा एक आढावा घेऊ या.

  • Share this:

पाटना, 27जुलै: बुधवारी संध्याकाळ नंतर बिहारमधील राजकीय समीकरणं क्षणोक्षणी बदतल होती. आधी नितीश कुमारांनी राजीनामा दिला,त्यानंतर भाजपने जेडीयूला पाठिंबा दिला. लालू प्रसाद यादव म्हणाले की महागठबंधन नाही तुटले आणि पुन्हा नवीन नेता निवडला गेला. चला तर बिहारमध्ये क्षणोक्षणी राजकीय समीकरणं कशी बदलत गेली याचा एक आढावा घेऊ या.

संध्याकाळी 6.35 वाजता: नितीश कुमार यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला.

संध्याकाळी 6.39 वाजता: पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांचा राजीनाम्याचे स्वागत केले आणि नितीश कुमारांचे अभिनंदनही केले.

संध्याकाळी 6:40 वाजता:नितीश कुमारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, 'आम्ही 'गठबंधन धर्मा'चे पालन केले,पण अशी परिस्थिती निर्माण झाली होती ज्यात काम करणे कठीण झाले होते. आम्ही तेजस्वी यादवांचा राजीनामा मागितला नव्हता तर त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण मागितले होते'.

संध्याकाळी 7.30 वाजता: लालू प्रसाद यादवांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. महागठबंधन अजून तुटले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसंच नितीश कुमार कलम302 अंतर्गत हत्येचे आरोपी आहेत असा आरोपही लालूंनी नितीश कुमार यांच्यावर केला.

रात्री 9.15 वाजता : बिहारचे भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी एन.डी.एचा नितीश कुमारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

रात्री 10.10वाजता: लालू प्रसादांनी ट्विट करून नितीश कुमारांवर टीका केली. ज्या भाजपविरुद्ध रेकॉर्ड ब्रेक मतं मिळाली होती त्याच भाजपसोबत नितीश कुमार आता सत्ता स्थापन करत आहेत. नैतिकता आणि भ्रष्टाचार विरोधाचे गोडवे गाणाऱ्या नितीश कुमारांनी निवडणूक लढवायला हवी.

रात्री 10:30 वाजता:भाजपने राज्यपालांना पत्र देऊन नितीश कुमारांना पाठिंबा दिला.

रात्री 10:40 वाजता: नितीशने भाजप नेत्यांना भोजनास बोलावले. दरम्यान मुख्यमंत्री निवासाबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या.

रात्री 11.14 वाजता : रूग्णालयात गेलेले राज्यपाल राजभवनात परतले.

रात्री 11.17 वाजता : रांचीला चाललेले लालू प्रसाद यादव म्हणाले की,' नितीश कुमार तेजस्वीला घाबरले,त्यांना भीती वाटत होती की तेजस्वी मुख्यमंत्री होतील.' तसंच शरद यादवांसोबत अनेक नेते नितीश कुमारांवर नाराज असल्याचंही लालूंनी सांगितलं.

रात्री 11:27 वाजता: राजदने तेजस्वी यादव यांना विरोधी पक्ष नेता बनवलं.

रात्री 11:31 वाजता : लालू म्हणाले,'राज्यपालांनी आम्हाला सत्ता बनवण्यास संधी द्यावी'

रात्री 11:54 वाजता : नितीश कुमार जेडीयूच्या पाच आणि भाजपच्या पाच विधायकांसोबत राजभवनात पोचले.

रात्री 11:56 वाजता : नंद किशोर आणि ललन सिंह राजभवनात पोचले.

रात्री 12 वाजता: नितीश सोडून सगळे नेता राज्यपालांना भेटले.

रात्री 1:28 वाजता: नितीश कुमार राजभवनातून बाहेर निघाले.

रात्री 1:29वाजता: नितीश कुमार यांना 132 आमदारांचे समर्थन असल्याचे सुशील कुमार मोदींनी सांगितलं.

रात्री 2:22 वाजता : राजद नेते तेजस्वी यादव राजभवनात राज्यपालांना भेट घेण्यास पोचले.

रात्री 3 वाजता : तेजस्वी यादवांनी राज्यपालांना राजदला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायची मागणी केली असल्याचं माध्यमांना सांगितलं.

रात्री 3:11 वाजता: तेजस्वी यादवांनी राजभवनात जाऊन शपथविधी सोहळा रद्द करण्याची मागणी केली.

रात्री 3:19 वाजता: तेजस्वी यादव राजभवनातून बाहेर निघाले.

रात्री 3:30 वाजता: शपथविधी सोहळ्याची वेळ 10 वाजता निश्चित करण्यात आली

सकाळी 10 वाजता: नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाची तर सुशील कुमार मोदींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

First published: July 27, 2017, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading