जोधपूरच्या कोर्टात आज काय घडलं?

जोधपूरच्या कोर्टात आज काय घडलं?

वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर मुख्य न्यायदंडाधिका-यांनी दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. गुरूवार 5 एप्रिल ला जेव्हा पाच वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा कोर्टाबाहेरच्या बिष्णोई समाजानं एकच जल्लोष केला.

  • Share this:

जयपूर,05 एप्रिल : वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर मुख्य न्यायदंडाधिका-यांनी दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

गुरूवार 5 एप्रिल ला जेव्हा पाच वर्षांची शिक्षा सुनावली तेव्हा कोर्टाबाहेरच्या बिष्णोई समाजानं एकच जल्लोष केला.

कोर्टात नेमकं काय झालं?

स.11वा –  सलमान खान कोर्टात दाखल. त्याच्या बहिणी अर्पिता आणि अलविराही कोर्टात

स.1:05वा – नीलम, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे कोर्टात

स.11:15वा – सुनावणीला सुरुवात

स.11:20वा – नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान निर्दोष

स.11:25वा – सलमान खान दोषी घोषित

स.11:30वा – सलमान वगळता इतर कलाकार कोर्टातून बाहेर. कोर्टात सलमानच्या शिक्षेवर युक्तीवादाला सुरूवात.

दु. 2वा – मुख्य न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड ठोठावला.

दु. 2:45वा – सलमान त्याच्या कोर्टातून बाहेर. पोलिसांनी घेतलं ताब्यात.

दु. 3.15वा – सलमान जोधपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल.

 

दरम्यान यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यस्था करण्यात आली होती. बिष्णोई समाजाचे कार्यकर्ते कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सरकारी वकीलाचा दावा – सलमान सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे.

सलमानच्या वकीलाचा दावा – सलमानवर यापूर्वीचे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सामाजिक कामंही केली आहेत. त्याला दोषी ठरवलं आहे. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याला जास्तीत जास्त एकच वर्षाची शिक्षा व्हावी अशी विनंती.

दुपारच्या जेवणापर्यंत सलमानच्या शिक्षेवरील सुनावणी सुरूच राहिली. मात्र शिक्षा जेवणाच्या सुट्टीनंतर सुनावण्यात आली.

जेवणाच्या सुटीच्या काळात सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा कोर्टाबाहेर फोनवर बोलत होत्या तर सलमान कोर्टात शांतपणे खुर्चीवर बसला होता.

जेवणाची सुटी संपल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात आले आणि सलमान उठून उभा राहिला. त्याच्या शेजारी त्याच्या बहिणीही होत्या.

दु.2वा – मुख्य न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

कोर्टाबाहेर बिष्णोई समाजाच्या लोकांनी एकच जल्लोष केला. तर देशभरात सलमानच्या चाहत्यांमधे नाराजी पसरली.

दु.3.15वा – सलमान जोधपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल.

दरम्यान सलमानच्या वकीलानं जोधपुर सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला त्याच्यावर उद्या सकाळी 10.30 वा सुनावणी होईल.

 

 

 

First published: April 5, 2018, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading