Home /News /national /

नवीन कृषी कायदा समितीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? शेतकरी नेत्याने सांगितली INSIDE STORY

नवीन कृषी कायदा समितीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? शेतकरी नेत्याने सांगितली INSIDE STORY

21 जानेवारीपासून देशातील शेतकरी संघटनांसोबत टप्प्याटप्प्यानं चर्चा सुरू होणार असल्याची बाब समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या शेतकरी समितीची पहिली अंतर्गत बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत डॉ. अशोक गुलाटी, डॉ. प्रमोद जोशी आणि शेतकरी नेते अनिल घनवट सामील झाले होते. या समितीचे चौथे सदस्य माजी खासदार भूपेंद्रसिंह मान यांनी मात्र समितीपासून दूर राहणं पसंत केल्याचं समोर आलं आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त शेतकरी समितीचे सदस्य अनिल घनवट यांची न्यूज18 लोकमतला या बैठकीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते यावेळी म्हणाले की, मी पंजाबच्या शेतकऱ्यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर चर्चेला आले आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या माध्यमातून आपण यावर नक्की मार्ग काढू. ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या हिताचाच अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याशिवाय हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली समिती ही आंदोलकांचं 100 टक्के म्हणणं ऐकून घेईल. इतकच नाही तर ज्या शेतकरी संघटना पुढे येऊन बोलत नाहीत त्यांच्याशी सुसंवादाचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. हे सर्वांसमोर आहे आणि यासाठी कायद्यात बदलाची गरज आहे. धनवट पुढे म्हणाली की, तेदेखील कायदा पूर्णपणे योग्य असल्याचं मानत नाहीत, मात्र शेतकऱ्यांना आपली तक्रार समितीसमोर सांगण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे ही वाचा-खासदारांना 50 रुपयांत चिकन करी नाही मिळणार! संसदेतील कॅन्टीनबाबत घेतला निर्णय गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. नव्या तिन्ही कृषी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी एका समितीचं गठण केलं आहे. नवीन कृषी कायद्याशी संबंधित सर्व घटकांचं म्हणनं ऐकूण घेणार असल्याचा विश्वास समितीच्या सदस्यांकडून देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे समितीचं कामकाज चालणार आहे. याशिवाय 21 जानेवारीपासून देशातील शेतकरी संघटनांसोबत टप्प्याटप्प्यानं चर्चा सुरू होणार असल्याची बाब समोर आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या