Home /News /national /

वायू प्रदूषण सर्वाधिक कोणत्या कारणामुळे होतं? ICMR च्या अहवालात माहिती समोर

वायू प्रदूषण सर्वाधिक कोणत्या कारणामुळे होतं? ICMR च्या अहवालात माहिती समोर

आयसीएमआरच्या अहवालानुसार, वीज प्रकल्प, उद्योग आणि घरांमध्ये कोळसा जाळल्यामुळे भारतात अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. औद्योगिक प्रदूषण (Industrial Pollution) हे भारतातलं प्रदूषण आणि अकाली मृत्यूचं (Pollution and Premature Mortality) दुसरं सर्वांत मोठं कारण आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : देशामध्ये प्रदूषणाची ( Air Pollution) समस्या गंभीर होत आहे. देशाची राजधानी अर्थात दिल्ली शहराची ओळख तर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आहे. प्रदूषणामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, की हवेचं सर्वांत जास्त प्रदूषण कोणत्या कारणामुळे होतं? 'ICMR'ने अलीकडेचे याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेच्या अहवालात असं समोर आलं आहे, की कोळशावर चालणारे विद्युतनिर्मिती प्रकल्प (Power Project) हे भारतातलं प्रदूषण आणि अकाली मृत्यूचं (Premature Mortality) सर्वांत मोठं कारण आहे. यासोबतच भारतातलं वायू प्रदूषण आणि हवामानबदल (Air Pollution and Climate Change) रोखण्यासाठी कोळशापासून वीजनिर्मिती करणं कमी करावं लागेल, असंही आयसीएमआरने अहवालात म्हटलं आहे. किरकोळ कारणातून तरुण बनले राक्षस; खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू भारतात हवामानबदल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या अहवालाच्या आधारे आयसीएमआरने दी लँसेटच्या (The Lancet) सहकार्याने नवीन मार्गदर्शक तत्त्वं तयार केली आहेत. अहवालातल्या धोरणात्मक शिफारशीनुसार भारताला कोळशापासून वीज बनवण्यावर अवलंबून राहणं सोडावं लागेल. याशिवाय वाहनं आणि उद्योगधंद्यांच्या प्रदूषणावरही नियंत्रण ठेवावं लागणार आहे. यासोबतच प्राण्यांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी चांगला मार्ग स्वीकारावा लागेल. आयसीएमआरच्या अहवालानुसार, वीज प्रकल्प, उद्योग आणि घरांमध्ये कोळसा जाळल्यामुळे भारतात अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. औद्योगिक प्रदूषण (Industrial Pollution) हे भारतातलं प्रदूषण आणि अकाली मृत्यूचं (Pollution and Premature Mortality) दुसरं सर्वांत मोठं कारण आहे. तिसरा क्रमांक म्हणजे वाहनांचा धूर. त्यानंतर प्राण्यांमुळे होणारं प्रदूषण हे भारतातल्या प्रदूषणाचं महत्त्वाचं कारण आहे. एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? उत्तर ऐकून तुम्हालाही घाम फुटेल अहवालातल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे, की 2015 च्या तुलनेत 2019 मध्ये कोळशामुळे तयार होणाऱ्या पार्टिक्युलेट मॅटर-2.5 अर्थात पीएम-2.5 मुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत 9 टक्के वाढ झाली आहे. 2019 मध्ये भारतात पीएम-2.5 प्रदूषणामुळे 9 लाख 7 हजार मृत्यू झाले. त्यापैकी 17 टक्के म्हणजे 1 लाख 57 हजार मृत्यू हे वीजनिर्मिती प्रकल्पातल्या कोळशातून बाहेर पडणाऱ्या पीएम-2.5 कणांमुळे झाले. हे मृत्यू 2015 च्या तुलनेत 9 टक्के अधिक आहेत. भारतातल्या अनेक शहरांमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे.
First published:

Tags: Air pollution, Climate change

पुढील बातम्या