मराठी बातम्या /बातम्या /देश /

'बर्ड फ्लू'कडे दुर्लक्ष नको! 'या' गोष्टी कराल तर राहाल रोगापासून दूर...

'बर्ड फ्लू'कडे दुर्लक्ष नको! 'या' गोष्टी कराल तर राहाल रोगापासून दूर...

बर्ड फ्लूला हलक्यात घेणं योग्य नाही. या जीवघेण्या आजारापासून वाचायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्याच लागतील.

बर्ड फ्लूला हलक्यात घेणं योग्य नाही. या जीवघेण्या आजारापासून वाचायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्याच लागतील.

बर्ड फ्लूला हलक्यात घेणं योग्य नाही. या जीवघेण्या आजारापासून वाचायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्याच लागतील.

  • Published by:  News18 Desk

देशासह जगभरात घोंघावत असलेलं कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. तशातच देशात (India) दाखल झालेला बर्ड फ्लू (bird flu) लोकांना अस्वस्थ करतो आहे. देशात राजस्थान (Rajsthan) , हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्याचं आता निश्चित झालं आहे. हा रोग इन्फ्लुएंजा टाइप H5N1 व्हायरसमुळं पसरतो. WHO च्या एका अहवालानुसार, या व्हायरसमुळं संसर्ग (infection caused due to H5N1 Virus) झालेल्या लोकांमध्ये मृत्यू दर जवळपास 60% आहे. म्हणजे कोरोनापेक्षाही (corona) जास्त जीवघेणा असा हा रोग आहे.

या रोगापासून वाचायचं असेल,तर काय करायला हवं आणि काय नको हे जाणून घेतलं पाहिजे.

साफसफाई - छतावर ठेवलेल्या टाक्या, रेलिंग्ज, जाळ्या किंवा पिंजरे यांना डिटर्जंटनं नीट साफ करा. पक्ष्यांची विष्ठा किंवा पंखांचा कचरा अतिशय काळजीपूर्वक साफ करा. पक्ष्यांना थेट हातानं पकडू नका. त्यांच्यापासून एक अंतर राखतच वावरा. H5N1 नं संक्रमित झालेले पक्षी जवळपास 10 दिवस विष्ठा किंवा लाळेतून व्हायरस पसरवू शकतात.

कच्चं मांस-पृष्ठभाग यांना स्पर्श नका करू - दुकानातून चिकन (chicken) विकत घेतल्यानंतर  धूताना हातावर ग्लोव्ज आणि तोंडावर मास्क नक्की घाला. कुठल्याही प्रदूषित पृष्ठभागाच्या माध्यमातून तुम्हाला व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गरजेचं असताना सतत सॅनिटायजर वापरा.

नीट शिजवूनच खा - चिकनला किमान 100 डिग्री तापमानावर शिजवा. कच्चं मांस किंवा अंडी खाण्याची चूक करू नका. तज्ञांच्या मते, हा व्हायरस विशिष्ट तापमानात टिकतो.

या गोष्टीही ध्यानात ठेवा - पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बोलताना काळजी घ्या. घरातल्या कुठल्याही संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून विशिष्ट अंतर राखून रहा.

कुठलं चिकन खरेदी कराल- चिकन विकत घ्यायला गेल्यावर अशक्त आणि आजारी वाटणाऱ्या कोंबड्यांचं चिकन विकत घेऊ नका. हा कोंबडा व्हायरसचा संसर्ग झालेला असू शकतो. स्वच्छ केललं चांगल्या दर्जाचं चिकनच घ्या.

First published:

Tags: Bird flu, India, Virus