प्रियांका गांधी यांनी शक्ती प्रदर्शन तर केले, पण या 5 आव्हानांचे काय?

प्रियांका गांधी यांनी शक्ती प्रदर्शन तर केले, पण या 5 आव्हानांचे काय?

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काल लखनऊमध्ये रोड शोद्वारे शक्ती प्रदर्शन केले. या रोड शोमध्ये त्या एकही वाक्य बोलल्या नाहीत.पण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. पण आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. आता प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध लढताना त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना त्या कशा सामोऱ्या जातात त्यावर काँग्रेसचे यश ठरणार आहे.

वाचा: नेहरू,इंदिरा, सोनिया आणि प्रियांका गांधी, काँग्रेसचा सुवर्णकाळ कोणाच्या नेतृत्वाखाली?

1) कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे- 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा ऐतिहासिक पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या जितक्या 2014मध्ये मिळाल्या. या पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा डिसेंबरमध्ये 3 राज्यातील विजयामुळे काही प्रमाणात कमी झाली. पण उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अद्याप काँग्रेस पक्ष मजबूत नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची असेल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्यास काँग्रेसच्या जागा वाढण्यास मदत होऊ शकते.

2) विजय मिळवून देण्याचे आव्हान- 2014मध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या जागांवर यंदा विजय मिळवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे दिल्लीत सत्ता मिळवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये अधिक जागा मिळवणे गरजेचे आहे. प्रियांका गांधी यांनी जर दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर काँग्रेसला यश मिळवून दिले तर त्यांच्या जागा दुप्पट होऊ शकतील.

पाहा:VIDEO : राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, UNCUT भाषण

3) मोदी-योगी यांच्याशी थेट लढत- प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील ज्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो भाग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. तसेच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ देखील पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. त्यामुळेच मोदी आणि योगी यांच्या बाल्लेकिल्ल्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असेल.

4) उमेदवारांची निवड- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचे सर्वात मोठे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढताना विजयी होणारा आणि विश्वासू अशा उमेदवाराची निवड प्रियांका यांना करावी लागणार आहे.

5) गांधी कुटुंबावरील आरोपांना तोंड देणे- पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबावर आरोप केले जातात. या आरोपांना यापुढे प्रियांका गांधी यांना उत्तर द्यावे लागेल. निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक आरोपाला प्रियांका कशा पद्धतीने उत्तर देतात त्यावर देखील काँग्रेसचे यश ठरणार आहे.

VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले

First Published: Feb 12, 2019 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading