मराठी बातम्या /बातम्या /देश /

आंध्र प्रदेशात मंदिरांवरील हल्ल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये तिहेरी संघर्ष ? नेमका दोष कुणाचा, वाचा सविस्तर

आंध्र प्रदेशात मंदिरांवरील हल्ल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये तिहेरी संघर्ष ? नेमका दोष कुणाचा, वाचा सविस्तर

गेल्या 19 महिन्यांमध्ये आंध्र प्रदेशात तब्बल मंदिरांची, मूर्तींची तोडफोड केल्याच्या 140पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत

गेल्या 19 महिन्यांमध्ये आंध्र प्रदेशात तब्बल मंदिरांची, मूर्तींची तोडफोड केल्याच्या 140पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत

गेल्या 19 महिन्यांमध्ये आंध्र प्रदेशात तब्बल मंदिरांची, मूर्तींची तोडफोड केल्याच्या 140पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत

  • Published by:  Meenal Gangurde

हैद्राबाद, 4 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) सतत हिंदू मंदिरांवर हल्ले (Hindu Temple Vandelism) होत असल्यानं राज्यातल्या मुख्य राजकीय पक्षांमध्ये तिहेरी संघर्ष सुरू झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या हल्ल्यांसाठी दुसऱ्या पक्षाला जबाबदार ठरवत आहे. गेले दीड वर्षे सुरू असलेल्या या हल्ल्ल्यांबाबत केंद्रानं कारवाई करण्याची मागणी भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली आहे.

2019 पासून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे, वाय. एस. जगन मोहन रेड्डी या प्रकरणी लक्ष्य करण्यात येत आहेत.  डिसेंबर 2020 मध्ये रामतीर्थम इथल्या मंदिरातील श्री रामाची मूर्ती भंग करण्यात आली. तेव्हापासून आंध्रमध्ये मंदिरांवरील हल्ल्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला.

आकडे काय सांगतात ?

गेल्या 19 महिन्यांमध्ये आंध्र प्रदेशात तब्बल मंदिरांची, मूर्तींची तोडफोड केल्याच्या 140पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत, मात्र राज्यसरकारनं कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत, असा आरोप भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी केला आहे, तर अंतर्वेदी रथयात्रेत रथ जाळण्याच्या घटनेसह 44 प्रकरणांपैकी 28 प्रकरणांचा विशेष तपास पथकानं तपास यशस्वीपणे पूर्ण केल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक गौतम सवंग यांनी दोन आठवड्यांपूर्वी सागितलं. माजी केंद्रीय मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनीही 19 महिन्यात 128 मंदिरांवर हल्ले झाल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यत राज्यात मंदिराच्या विरोधात किमान 20 मोठे हल्ले झाले असल्याचं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-7 लाखात घरं केलं खरेदी; आणि घरात सापडला 2 कोटींचा खजिना, VIDEO मध्ये पाहा घटना

कोणत्या पक्षाची काय भूमिका ?

मंदिरांवरील हल्ल्यांचा मुद्दा आंध्र प्रदेशात वणव्यासारखा पसरला आहे. यावरून वायएसआरसीपी (YSRCP), टीडीपी (TDP) आणि भाजप (BJP) या राजकीय पक्षांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. प्रत्येक पक्षाची या प्रकरणात काय भूमिका आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

सत्तारूढ वायएसआरसीपीची भूमिका : आंध्र प्रदेशातील मंदिरावरील हल्ल्यांप्रकरणी सर्वात जास्त आरोप सत्तारूढ वायएसआरसीपी पक्षावर होत आहेत. या प्रकरणी सरकारची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पक्षानं तीन मंदिरांच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्ष पदावर असलेल्या राजू यांना बेजबाबदारपणाचा आरोप करत पदावरून हटवलं. मात्र यामुळं इतर ज्या मंदिरांवर हल्ले झाले त्यांच्या विश्वस्त मंडळाचे पदाधिकाऱ्यांना का हटवण्यात आलं नाही, असा प्रश्न सरकारला विचारला जावू लागला आहे. वायएसआरसीपीवर हा पक्ष ख्रिश्चन लोकांना महत्त्व देणारा पक्ष असल्यानं आणि राज्याच्या  ख्रिश्चन गृहमंत्री मेकातोती सुचारिता यांच्या हाती या प्रकरणाची सूत्रे असल्यानं दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.      

यावर सत्तारूढ पक्षाचं असं म्हणणं आहे की, या पक्षाचे सरकार आल्यापासून आणि त्यांनी कल्याणकारी योजना राबवायला सुरुवात केल्यापासून हे हल्ले सुरू झाले आहेत. सरकारची प्रतिमा डागाळण्याच्या हेतूनं हे रचलेलं हे राजकीय षड्यंत्र आहे. राज्यातील सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी असे हल्ले घडवून आणले जात असून, यामागे तेलगु देशम पार्टीचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षानं केला आहे.

टीडीपीची भूमिका : चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu)यांच्या टीडीपी अर्थात तेलगु देसम पार्टीनं नेहमीच मुस्लिमांना केंद्रस्थानी ठेवून ठेवलेल्या राजकारणाला पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. 2016 मध्ये टीडीपीनं विकासकामं आणि रस्ता रुंदीकरणाच्या कार्याचं निमित्त देऊन कृष्णा नदीवरील डझनभर मंदिरं तोडली होती. या मुद्द्यावरून रेड्डी यांच्या पक्षानं टीडीपीवर केवळ आरोप केले नसून, नुकसान भरपाई म्हणून 8 जानेवारीला अशा 30 मंदिरांच्या जीर्णोद्धाराची पायाभरणीही केली आहे.

भाजपची भूमिका : देवळांवरील हल्ल्याच्या राजकारणात भाजपची काय भूमिका आहे, हे महत्त्वाचे ठरते. टीडीपीचं सरकार सत्तेवर असताना भाजपाचा त्यांना पाठिंबा होता. टीडीपीनं मंदिरं पाडली तेव्हा भाजपनं कोणतीही भूमिका घेतली नाही. भाजपचं समर्थन करणाऱ्या राजकीय विश्लेषकांचा हवाला देऊन लिहिलेल्या एम. आर. सुब्रमणि यांच्या लेखात म्हटलं आहे की, राज्यात हिंदूंची प्रार्थनास्थळे तोडल्याबद्दल हिंदूंनाच दोषी ठरवलं जात आहे. अन्य विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, नायडू सरकारनं  मंदिरे पाडली त्याबाबत कोणताही गोंधळ झाला नाही, तेव्हा हिंदुविरोधी घटकांना अभय मिळालं आणि या सरकारमध्ये ही प्रवृत्ती वेगानं फोफावली. आता भाजप हिंदूचा पक्ष आणि राज्य सरकारविरोधात मोर्चेबांधणी केली असली तरी  टीडीपीपासून विभक्त झाल्यानंतर भाजपानं अप्रत्यक्षपणे रेड्डी सरकारला समर्थन दिलं आहे.

कोण आहे दोषी ? : यामुळं आता प्रश्न उभा राहतो की टीडीपी दोषी आहे तर राज्यसरकार विरोधी पक्ष सदस्यानां अटक का करत नाही? भाजपवर या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे तर त्याला पुरावा काय आहे? फक्त राजू यांना पदावरून का हटवण्यात आलं? या सगळ्या प्रश्नांवर रेड्डी सरकारचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे हे राजकीय कट कारस्थान आहे. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष हे सगळं करत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्लेषकांचा असाही आरोप आहे की, राज्याच्या गृहमंत्री सुचरिता यांनी या हल्ल्याबद्दल माफी मागितली असली तरी या प्रकरणी अनेक महिन्यांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात आली नाही की कोणालाही अटक करण्यात आली नाही, यावरून रेड्डी सरकारचा याबाबतीत काय दृष्टीकोन आहे हे स्पष्ट होतं. रेड्डी सरकारनं या हल्ल्यांवर टीकाही केली नाही. त्यांच्या या भूमिकेमुळं हल्लेखोरांना अधिक बळ मिळालं आहे.  

राजकीय आणि सामाजिक वातावरण कसे आहे?

तुमच्या लक्षात असेल तर, हैद्राबादमध्ये महापालिका निवडणुका जवळ आल्यावर तिथं धार्मिक संघर्ष आणि वादविवाद सुरू झाले होते. तिरुपतीमध्ये पोट निवडणुकांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला असून यात वायएसआरसीपी आणि टीडीपी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत आहेत, तर भाजप या मुद्द्यावरून आपलं घोडं पुढं दामटत आहे. आंध्रात तालिबान, बायबल पार्टी विरुद्ध भगवत गीता पार्टी अशा घोषणा होत असून, लोकांना तुम्ही कोणत्या बाजूनं आहात असा प्रश्न विचारून विचलीत केलं जात आहे.

 

First published:

Tags: Andhra pradesh