मराठी बातम्या /बातम्या /देश /

सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पश्चिम रेल्वेचं पत्र

सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पश्चिम रेल्वेचं पत्र

इतिहासातील सर्वात मोठा हल्ला होण्याची शक्यता असून दहशतवादी रेल्वे स्टेशनला टार्गेट करण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या पत्रात व्यक्त करण्यात आली.

इतिहासातील सर्वात मोठा हल्ला होण्याची शक्यता असून दहशतवादी रेल्वे स्टेशनला टार्गेट करण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या पत्रात व्यक्त करण्यात आली.

इतिहासातील सर्वात मोठा हल्ला होण्याची शक्यता असून दहशतवादी रेल्वे स्टेशनला टार्गेट करण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या पत्रात व्यक्त करण्यात आली.

मुंबई, 1 मार्च : भारत पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. जैश ए मोहम्मदचे पाकिस्तानातील तळ हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने गुप्तचर संस्थांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. य़ाच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेने लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाला पोलिसांकडून मिळालेल्या फॅक्सनुसार पुलवामा हल्ल्यानंतर दहशतावादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेस्टेशन, मंदिरे या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाऊ शकतो. दहशतवादी इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्वेच्या पत्रात म्हटलं आहे की यात हैदराबादची व्यक्ती असून त्याचे नाव मोहम्मद इब्राहिम असे आहे. त्याच्यासोबत रेहान नावाचा आत्मघाती हल्लेखोर असून एक वयस्क महिलेचाही समावेळ आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर रेल्वेस्थानक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व स्टेशन आणि रेल्वेवर क़डक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यात खासकरुन जम्मू काश्मीरहून येणाऱ्या रेल्वेकडे लक्ष द्यावे असं पत्रात म्हटलं आहे. मात्र अद्याप या पत्राबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून आलेली नाही.

पुलवामा हल्ल्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या तळांना नेस्तनाबूत केलं. भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी मंगळवारी सकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 1 हजार किलो बॉम्ब फेकले. त्यानंतर पाकिस्तानने भारतात विमान घुसवण्याचा प्रयत्न केला पण भारताने त्यांना पिटाळून लावले.

35 भारतीय प्रवासी पाकिस्तानात अडकले, लाहोर स्थानकावरील EXCLUSIVE VIDEO

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-346347" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzQ2MzQ3/"></iframe>

First published:

Tags: High alert, Jaish e mohammd, Kashmir, Pulwama, Terror attack, Western railway