Home /News /national /

Yaas Cyclone: यास चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमध्ये कहर, व्हिडिओ आले समोर

Yaas Cyclone: यास चक्रीवादळाचा पश्चिम बंगालमध्ये कहर, व्हिडिओ आले समोर

Yaas Cyclone Updates:पश्चिम बंगाल (West Bengal)मध्ये सध्या यास चक्रीवादळा (Yaas Cyclone)चा कहर पाहायला मिळत आहे.

    कोलकात्ता, 26 मे: पश्चिम बंगाल (West Bengal)मध्ये सध्या यास चक्रीवादळा (Yaas Cyclone)चा कहर पाहायला मिळत आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टी भागात यास चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. यामुळे अनेक घरांवरचे छप्पर उडून गेलेत. सध्या वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटर आहे. यास चक्रीवादळाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. किनारपट्टी भागातून जवळपास 50 हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. यास चक्रीवादळ पारादीपपासून 140 किमी अंतरावर, तर बालासोरपासून 220 किमी अंतरावर. परिणामी इथं 150 किमी प्रतितास इतक्या वेगाहून जास्त सोसाट्याचे वारेही मोठं नुकसान करण्याची शक्यता असल्याचं म्हणत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. ओडिशामध्ये सकाळी नऊच्या सुमारास वादळाच्या लँडफॉलला सुरुवात झाली. त्यानंतर दक्षिण 24 परगण्यातही त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली. मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. ओडिशामध्ये जगतसिंहपूर, केंद्रपाडा, जाजपूर, भद्रक, मयूरभंज, कटक, ढेंकनाल आणि इतर भागांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची नोंद करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील किनारी भागात समुद्राचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cyclone, West bengal

    पुढील बातम्या