सीबीआय चौकशी: का घाबरत आहेत ममता बॅनर्जी, जाणून घ्या या प्रकरणाबद्दल A to Z

मोदी विरुद्ध ममता या संघर्षाचे नेमके काय कारण आहे हे जाणून

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 11:20 AM IST

सीबीआय चौकशी: का घाबरत आहेत ममता बॅनर्जी, जाणून घ्या या प्रकरणाबद्दल A to Z

कोलकाता, 04 फेब्रुवारी: केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद काही नवे नाहीत. पण सध्या मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार यांच्यात सुरु असलेला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या संघर्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचा जसा संदर्भ आहे तसाच ममता यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा देखील आहे. मोदी सरकार ममता यांना कोंडी पकडण्याची संधी सोडत नाही. मोदी विरुद्ध ममता या संघर्षाचे नेमके काय कारण आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

काय आहे नेमके प्रकरण

रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड प्रकरणी सीबीआय कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार यांना अटक होणार आहे. चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कुमार यांच्यावर संशय आहे. याआधी सीबीआयने त्यांना दोन वेळा समन्स बजावले होते तरी त्यांनी चौकशीत सहकार्य केले नाही. या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे 40 जणांचे पथक कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. रोझ व्हॅली घोटाळा 15 हजार कोटी तर शारदा चिटफंड घोटाळा 2 हजार 500 कोटी रुपयांचा आहे.

काय आहे रोझ व्हॅली घोटाळा

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या या घोटाळ्यात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आहेत. रोझ व्हॅली ग्रुपने सामान्य लोकांकडून पैसे घेत 1 लाख गुंतवणूकदारांना चुना लावला. आशीर्वाद आणि हॉलिडे मेंबरशिप नावाखाली ग्रुपने लोकांकडून पैसे घेतले होते. शिवमय दत्ता हा या घोटाळ्याचा मास्टर माईंड असल्याचे बोलले जाते.

Loading...

शारदा चिटफंड घोटाळा

अधिक पैसे देण्याची ऑफर देऊन शारदा ग्रुपने लोकांची फसवणूक केली होती. यात 1 लाख रुपयांची गुंतवणू्क केल्यास 25 वर्षानंतर 34 लाख रुपये दिले जातील असे सांगण्यात आले होते. या फंडमध्ये 10 लाख लोकांनी पैसे गुंतवले होते. अखेर कंपनी पैसे घेऊन फरार झाली.

या चिटफंडची चौकशी करणाऱ्या राज्य पोलिस दलाच्या SIT पथकाचे 2013मध्ये राजीव कुमार यांनी नेतृत्व केले होते. सीबीआयच्या मते राजीव यांनी या घोटाळ्यातून काही लोकांना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले. त्यामुळेच सीबीआयला राजीव कुमार यांची चौकशी करायची आहे. या दोन्ही घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 80 चार्जशीट फाईल केली आहे. तर एक हजार कोटींहून अधिक रुपये गोळा केले आहेत.


Special Report : राहुल गांधी महाराष्ट्रातल्या 'या' शहरात फोडणार प्रचाराचा नारळ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...