कोलकाता, 08 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात देशभरामध्ये काही विचित्र आणि मजेशीर घटना देखील पाहायला मिळत आहेत. 'हे फक्त भारतातच होऊ शकते', याची प्रचिती वेळोवेळी अशा घटनांमधून येते. असाच काहीसा प्रकार घडला आहे पश्चिम बंगालमध्ये. राज्याचील हुगली या जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने एका मुलीला जन्म दिला आणि त्यांनी चक्क या मुलीचं नाव 'कोरोना' असं ठेवलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अपरूपा पोद्दार यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं उपनाव (Nickname) कोरोना ठेवले आहे.खासदार अपरूपा पोद्दार या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आरामबाग हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांनी आणि त्यांचा नवरा मोहम्मद शाकीर अली यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला म्हणून तिचं नाव कोरोना ठेवलं आहे.
(हे वाचा-स्वस्त औषधं आणि व्हॉट्सअॅप-ईमेलवरून ऑर्डर, लॉकडाऊनध्ये मोदी सरकारची विशेष योजना)
विशेष म्हणजे अपरूपा यांची देखील दोन नावं आहेत. त्या आफ्रिन अली तसंच अपरुपा पोद्दार या दोन नावांनी ओळखल्या जातात. पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी अशी प्रथा आहे की जन्मलेल्या बाळाला पहिलं उपनाव दिलं जातं आणि त्यानंतर घरातील मोठ्यांकडून त्याचं अधिकृत नाव ठेवलं जातं. अपरूपा यांचा नवरा मोहम्मद शाकीर अली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांच्या मुलीचं नाव ठेवण्याची विनंती करणार आहेत.
(हे वाचा-27 वर्षीय IPS अधिकाऱ्याची अतुलनीय देशभक्ती, कोरोनाला हरवलं; आता करतोय रुग्णसेवा)
अशी विचित्र नाव ठेवण्याची भारतातील ही पहिली घटना नाही आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील एका दाम्पत्याने त्यांच्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' ठेवलं आहे. आणखी एक घटना म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एका दाम्पत्याने त्यांच्या मुलाचं नाव चक्क 'सॅनिटायझर' ठेवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.