मराठी बातम्या /बातम्या /देश /

पतीने पत्नीचा हात कापून केला वेगळा, कारण समोर येताच सगळ्यांना बसला धक्का

पतीने पत्नीचा हात कापून केला वेगळा, कारण समोर येताच सगळ्यांना बसला धक्का

मनातला संशय आणि भीतीमुळे माणूस काय करेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना अलीकडे समोर आली आहे. मनात आलेल्या संशयामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.

मनातला संशय आणि भीतीमुळे माणूस काय करेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना अलीकडे समोर आली आहे. मनात आलेल्या संशयामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.

मनातला संशय आणि भीतीमुळे माणूस काय करेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना अलीकडे समोर आली आहे. मनात आलेल्या संशयामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.

पश्चिम बंगाल, 07 जून: मनातला संशय आणि भीतीमुळे माणूस काय करेल, याचा नेम नाही. अशीच एक घटना अलीकडे समोर आली आहे. मनात आलेल्या संशयामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. पत्नी नोकरीवर गेल्यास आपल्यापासून दूर होईल, अशा भीतीपोटी या आरोपी व्यक्तीनं पत्नीचा हात धारदार शस्त्रानं वार करून कापून टाकला आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) पूर्व वर्धमान जिल्ह्यातील केतुग्राममध्ये घडली आहे. पतीने मित्रांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात या महिलेचा हात मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे.

पीडित महिला रेणू खातूनला सरकारी रुग्णालयात परिचारिकेची (Nurse) नोकरी मिळाली होती. पत्नीने नोकरी (Job) सुरू केली तर ती आपल्यापासून दूर जाईल आणि आपल्याला सोडून जाईल आणि त्यानंतर ती दुसऱ्या पुरुषाशी लग्न करेल, अशी भीती तिचा पती मोहम्मद शेखला वाटू लागली होती. अशातच रेणू खातूनने नोकरी सुरू केली. त्यामुळे ती रोज नोकरीला जाऊ लागल्यावर पती मोहम्मदचा संशय वाढत गेला आणि त्याला असुरक्षित वाटू लागलं होतं. यातच त्याच्या मित्रांनी त्याला चिथावणी देण्याचं काम केलं. तुझी बायको नोकरी करते आहे, त्यामुळे ती एकेदिवशी तुला सोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न करेल, असं ते शेखला म्हणायचे. त्यामुळे त्याच्या मनातील संशय बळावला. यासंदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

रेणू खातून म्हणाल्या, ‘जेव्हा माझं नाव सरकारी नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारंच्या यादीत आलं तेव्हा पतीने मला नोकरी न करू देण्याचा विचार केला होता. मी त्याला अनेक वेळा समजावलं; पण तो ऐकत नव्हता. यावरून आमच्यात भांडणं होऊ लागली. एकेदिवशी मला दुर्गापूरला जायचं होतं, त्याआधी माझ्या पतीने मला घरी बोलवलं. त्याच्या मनात काय चाललंय याची मला कल्पना नव्हती. रात्रीचं जेवण करून मी 10 वाजता झोपले. अचानक मला रात्री जाग आली तेव्हा तो वारंवार वॉशरूमला जात होता. मी विचारलं असता त्याने पोटात दुखत असल्याचं सांगितलं.’

HSC Result: 12वीच्या निकालाची तारीख ठरली, पाहा कधी आणि कुठे पाहता येणार निकाल

पुढे त्या म्हणाल्या, ‘थोड्याच वेळात कोणीतरी माझ्या तोंडावर उशी ठेवलीये आणि कोणीतरी माझा हात धरला आहे, असं मला जाणवलं. त्यानंतर कोणीतरी कात्रीसारख्या धारदार शस्त्राने माझा हात कापला. एकूण 3 जण होते आणि जातांना त्यांनी माझ्या तोंडावर उशी ठेवली. ते माझी सर्व कागदपत्रं (Documents) घेऊन गेले. यानंतर मला वर्धमान मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जखमा जास्त खोल असल्यानं तिथे प्राथमिक उपचारानंतर मला दुर्गापूर येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये हलवण्यात आलं.’

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू खातून यांचा उजवा हात पूर्णपणे कापला गेला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, कपाळावरही जखम झाली आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी आम्ही शस्त्रक्रिया (Surgery) केली असून, हात पुन्हा जोडला जाण्याच्या स्थितीत नसल्यानं तो कापावा लागला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

First published:

Tags: West bengal