Elec-widget

रस्त्यावर अचानक पडला 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा पाऊस, VIDEO VIRAL

रस्त्यावर अचानक पडला 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा पाऊस, VIDEO VIRAL

इमारतीमधून चक्क पैशांचा पाऊस पडला. पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

कोलकाता, 21 नोव्हेंबर: एका इमारतीतून चक्क पैशांचा पाऊस पडला आणि पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता इथे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. बेंटिक स्ट्रीट इथे दुपारी 2 वाजता अचानक 100, 200, 500 आणि दोन हजारच्या नोटांचा पाऊस पडायला लागला. पैसे पडत असल्याचं पाहाताच नागरिकांनी पैसे उचण्यासाठी एकच गर्दी केली. पैसेच नाही तर नोटांचे बंडलच्या बंडल इमारतीच्या मजल्यावरुन खाली पडत होते.

Loading...

27 नंबर बेंटिक स्ट्रीट इथे कर्मशियल बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर एका कंपनीच्या कार्यालयातील खिडकीतून हा नोटांचा पाऊस पडत असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. अवैध पैशांची देवाणघेवाण होत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अधिकारी कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. अधिकारी कंपनीच्या कार्यालयात पोहोचताच कंपनीतील अधिकाऱ्याची भंबेरी उडाली.

डीआरआय अधिकाऱ्यांनी अवैध पैसे पकडण्याआधीच कंपनीतील अधिकाऱ्यांनी बाथरुमच्या खिडकीतून पैसे खाली फेकून देण्यास सुरुवात केली. कोलकाता पोलिसांनी जवळपास रस्त्यावरुन 3 लाख 74 हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी डीआरआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...