बलात्कारानंतर जिवंत जाळण्याचा प्रयत्न, महिलेनं आरोपीलाही आगीत खेचलं

बलात्कारानंतर जिवंत जाळण्याचा प्रयत्न, महिलेनं आरोपीलाही आगीत खेचलं

  • Share this:

कोलकाता, 6 मार्च :  महिलेचा बलात्कार केल्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून समोर आला आहे. यावेळेस पीडित महिलेनं स्वतःसोबत आरोपीला देखील आगीच्या ज्वाळांमध्ये खेचले. या घटनेत आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून मालदा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले. महिलेला एक मुलगी असून ती विवाहित आहे. आरोपीकडून वारंवार नेहमी त्रास दिला जायचा, असा जबाब पीडित महिलेनं दिला आहे. घटनेच्या दिवशी पीडितेच्या घरात कोणी नसल्याचा फायदा आरोपीने घेतला आणि तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिला चक्क जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यानच महिलेनं स्वतःसोबत आरोपीलाही आगीमध्ये खेचले.

महिलेच्या घरातून धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर डॉक्टरांच्या माहितीनुसार महिला 80 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

First published: March 6, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading