आमच्या आदेशाचे पालन का नाही केलं; SCनं ममता बॅनर्जीला फटकारलं!

आमच्या आदेशाचे पालन का नाही केलं; SCनं ममता बॅनर्जीला फटकारलं!

Mamata Banerjee Governmentला सर्वोच्च न्यायालयानं contempt of courtची नोटीस पाठवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जुलै : Supreme Courtनं पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला अवमान नोटीस पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कार्यकर्ता प्रियांका शर्मा यांनी मिम्स तयार केले होते. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती. शिवाय, हे सारं प्रकरण सर्वाच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. त्यानंतर न्यायालयानं प्रियांका शर्मा यांना तातडीनं सोडण्याचे आदेश ममता बॅनर्जी सरकारला दिलं होते. पण, न्यायालयाच्या आदेशाचं पालन ममता बॅनर्जी सरकारकडून झालं नाही. याप्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून याप्रकरणात ममता बॅनर्जी यांना आवमान नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रियांका शर्मा यांना 10 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रियांका शर्मा यांचा भाऊ राजीव शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात या अटकेविरोधात धाव घेतली होती. पण, न्यायालयाच्या तात्काळ सोडण्याच्या आदेशानंतर देखील प्रियांका शर्मा यांना 24 तासानंतर सोडण्यात आलं होतं.

सरसंघचालक मोहन भागवत Twitterवर; नरेंद्र मोदी नाही तर यांना करतात Follow !

मीम्सचं प्रकरण काय होतं?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेट गालामध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिच्या लुक्सवर सर्वत्र चर्चा झाली होती. सोशल मीडियावर देखील त्यावर उलट – सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. तोच फोटो प्रियांक शर्मा यांनी वापरत त्याठिकाणी ममतांचा चेहरा लावला होता. शिवाय, तो फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर देखील केला होता.

प्रियांका शर्मा या भाजप युवा मोर्चाच्या नेत्या आहेत. अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. तृणमुल काँग्रेसचे नेते विश्वासचंद्र हाजरा यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. प्रियांका शर्मा यांच्या अटकेवर भाजपनं सवाल केले होते. पण, सर्वोच्च न्यायालयानं ममता बॅनर्जींची माफी मागा असे आदेश प्रियांका शर्मा यांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर देखील प्रियांका शर्मा यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.

SPECIAL REPORT : पहिला पाऊस...बघ मला तुझी आठवण येते का?

First published: July 1, 2019, 1:17 PM IST

ताज्या बातम्या