कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराला लोकांनी केला विरोध, पोलिसांनाही दिली धमकी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराला लोकांनी केला विरोध, पोलिसांनाही दिली धमकी

कोलकातामधील रुग्णाच्या अंत्यसंस्काराला लोकांनी केलेल्या विरोधामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

  • Share this:

कोलकाता, 24 मार्च : महाभयंकर अशा कोरोनाचा प्रसार भारतात वेगाने होत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाने 10 लोकांचा जीव घेतला आहे, तर कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 500हून जास्त आहे. सोमवारी (23 मार्च) रोजी कोलकातामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी या रुग्णांच्या अंत्यसंस्काराला लोकांनी विरोध केला. कोरोनाचा प्रसार होईल, असे सांगत त्यांनी रुग्णाचे प्रेत शहरात आणू दिले नाही. अखेर पोलिसांना बोलवण्यात आले, मात्र लोकांनी त्यांनाच धमकी देण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी त्यांनी स्मशानभूमीत प्रवेश करू नये यासाठी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते.

दरम्यान, मृत रुग्णाबाबत अनेक अफवाही पसरवण्यात आल्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णाच्या कुटुंबाला लोकांनी वाळीत टाकले होते. मृत रुग्णाच्या अमेरिकेत असलेल्या मुलाने पोलिसांकडून अंत्यसंस्कारासाठी संमतीपत्र घेतले होते, कारण लॉक डाऊनमुळे तो भारतात परतू शकला नाही. त्यांनी पत्रात, जर नियम असेल तर वडीलांचा मृतदेह कुटूंबाकडे सोपवावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला होता. मात्र लोकांनी केलेल्या विरोधामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

वाचा-VIDEO : मास्क न लावता घराबाहेर पडले, पोलिसांनी टी-शर्ट तोंडाला बांधायला लावला

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. तर, राज्यात आता एकूण रुग्णांची संख्या 8 झाली आहे. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी, कोरोना झालेले रुग्ण परदेश दौर्‍यावरुन परत आलेले आहेत. तर मृतांमधील एक ब्रिटन व दुसरा इजिप्तमधून परतला आहे, अशी माहिती दिली.

वाचा-'फक्त डिफेंड नाही, अटॅक करा', या खेळाच्या रणनीतीप्रमाणे कोरोनाशी लढा - WHO

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत रुग्णांला बेलियाघाटातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते. तर, दोन नवीन रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. पहिल्या तपासणीत दोघेही संक्रमित असल्याचे आढळले असून दुसर्‍या तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत, या आठ प्रकरणांव्यतिरिक्त, दमदम येथील 57 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा सोमवारी स्थानिक रुग्णालयात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला.

वाचा-कोरोनामुळे पाकमध्ये डॉक्टराचा मृत्यू,सहकारी म्हणाले,'चांगले मास्क तरी द्यायचे..'

कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारनेही राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन 27 मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, शहरातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 255 जणांना अटक केली.

First published: March 24, 2020, 2:39 PM IST

ताज्या बातम्या