S M L

दारूच्या नशेत तरुणाने कुत्र्याच्या कानाला घेतला चावा!

Updated On: Sep 4, 2018 11:31 PM IST

दारूच्या नशेत तरुणाने कुत्र्याच्या कानाला घेतला चावा!

कोलकाता, 04 सप्टेंबर : दारूच्या नशेत काही महाभाग काय करतील याचा नेम नाही. अशाच एका तळीरामाने चक्क कुत्र्याच्या कान चावल्याची घटना घडलीये. पश्चिम बंगालमधील हुगली तालुक्यात ही घटना घडली. शंभूनाथ धाली असं या दारूड्याचं नाव आहे.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शंभूनाथ धाली (वय 35) याने दारूच्या नशेत कुत्र्यावर हल्ला चढवला. त्याला दारूची इतकी नशा झाली होती तो काय करतो याचं त्याला भान नव्हतं. धाली हा बांधकाम मजूर आहे. कामावरून आल्यानंतर उत्तरपाडा इथं फुटपाथवर मुक्काम ठोकत होता.

धाली दररोज दारूच्या नशेत फुटपाथवर धिंगाणा घालत होता. त्यामुळे स्थानिक लोकं हैराण झाली होती.

दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्यामुळे भटके कुत्रेही त्याच्यावर भुंकायचे. मागील रविवारी असाच प्रकार घडला. दारूच्या नशेत असलेला धाली फुटपाथवर झोपण्यासाठी आपल्या जागी जात होत तेव्हा तिथे काही कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले त्यामुळे संतापलेल्या धालीने एका कुत्र्याला पकडले आणि कानाला चावा घेऊन तुकडाच काढला.

Loading...
Loading...

या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी धालीला पकडून चोप दिला. पण त्याने तिथून पळ काढला. पण पुढे जाऊन काही लोकांनी त्याला पकडलं आणि चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी धालीला अटक केली असून त्याला सोमवारी कोर्टात हजर करणार आहे.

दारूच्या नशेत मुक्या जीवावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तेलंगाणामध्ये एका तरुणाने दारूच्या नशेत चक्क जिवंत कोंबडीच खाल्ली होती. महबुबाबाद इथं हा विचित्र प्रकार घडला होता.

काही तरुण हे दारू पिऊन मस्ती करत होते. त्यातील एका पठ्याला इतकी दारू चढली की त्याने रस्त्यावरच लोटांगण घातलं. तर दुसऱ्या एका तर्राट तरुणाने चक्क जिवंत कोंबडी खाल्ली.

स्थानिक लोकांनी या तरुणांचा धिंगाणा पाहून त्याला अडवण्याचा प्रयत्न केलाही पण पठ्याने कुणाचं ऐकलं नाही. दारूच्या नशेत त्याने कोंबडी ठार मारली त्यानंतर कोंबडीचे दोन तुकडे केले. त्या तरुणाला दारू इतकी चढली होती की तो तिथेच मित्रांसोबत झोपी गेला. (संग्रहीत छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 11:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close