मुख्यमंत्र्यांनी मला 'तू चीज बडी है मस्त-मस्त' असं म्हणलं, राज्यपालांचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी मला 'तू चीज बडी है मस्त-मस्त' असं म्हणलं, राज्यपालांचा आरोप

माननीय मुख्यंमंत्र्यांनी राज्यपालांसाठी तू चीज बडी है मस्त मस्त हे शब्द वापरले. मी याचं उत्तर देणं योग्य वाटत नाही कारण मी त्या पदाचा मान राखतो असं ट्विट राज्यपालांनी केलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 28 नोव्हेंबर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जांगासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात सुरु असलेल्या वादाला आणखी तोडं फुटलं आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी असभ्य टीका केल्याचं राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी ट्विटरवरून हे आरोप केले आहेत.

राज्यपाल धनखड यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी तू चीज बडी है मस्त मस्त असे शब्द वापरले. राज्यपालांनी त्यांच्या ट्विटमध्ये एका बंगाली वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांबद्दल बोलताना त्यांचे नाव न घेता म्हटलं की, तू चीज बडी है मस्त मस्त.

वृत्तपत्रात 27 नोव्हेंबरला बातमी छापून आली. त्यात विधानसभेमध्ये संविधान दिनाबाबतचा उल्लेख कऱण्यात आला आहे. दरम्यान, माननीय मुख्यंमंत्र्यांनी राज्यपालांसाठी तू चीज बडी है मस्त मस्त हे शब्द वापरले. मी याचं उत्तर देणं योग्य वाटत नाही कारण मी त्या पदाचा मान राखतो.

याशिवाय आणखी एक ट्विट राज्यपाल धनखड यांनी केलं. यामध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संविधान दिवसाच्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर माध्यमांशी चर्चा करत आहेत. या ट्विटमध्ये धनखड यांनी म्हटलं की, मी कधी आदर देण्यात कमीपणा केला नाही. माननीय मुख्यमंत्री असले तरी त्यांना आदर दिला.

Published by: Suraj Yadav
First published: November 28, 2019, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading